💥 मोठी बातमी: कृषी विभागाची धडक कारवाई; श्रीरामपुरात खळबळ!
🚨 ब्रेकिंग न्यूज: श्रीरामपूर तालुक्यात 'या' ३७० औषधांच्या (जैव उत्प्रेरके) विक्रीवर तात्काळ बंदी! तालुका कृषी अधिकाऱ्यांचे कडक आदेश; कायद्याचे उल्लंघन केल्यास होणार थेट फौजदारी कारवाई

📰 खबरनामा न्यूज पोर्टल
💥 मोठी बातमी: कृषी विभागाची धडक कारवाई; श्रीरामपुरात खळबळ!
🚨 ब्रेकिंग न्यूज: श्रीरामपूर तालुक्यात ‘या’ ३७० औषधांच्या (जैव उत्प्रेरके) विक्रीवर तात्काळ बंदी! तालुका कृषी अधिकाऱ्यांचे कडक आदेश; कायद्याचे उल्लंघन केल्यास होणार थेट फौजदारी कारवाई

श्रीरामपूर (विशेष प्रतिनिधी): शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि शेती निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने एक अत्यंत मोठा पाऊल उचलले आहे. श्रीरामपूर तालुक्यात परवाना नसलेल्या जैव उत्प्रेरकांची (बायोस्टिम्युलंट्स) विक्री करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत.
प्रचलित वापरामध्ये असलेल्या सर्व जैव उत्प्रेरकांना खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुषंगाने, श्रीरामपूर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय (कृषि चिकित्सालय, गोंधवणी, पुणतांबा रोड) यांनी जा.क्र./तां/गुण नियंत्रण/ ९२४ /२०२६ अन्वये तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना आणि ‘कृषि निविष्ठा विक्रेते असोसिएशन’ला अधिकृत लेखी आदेश जारी केले आहेत.
⚠️ काय आहे कृषी विभागाचा आदेश?
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे शासनाकडून ‘जैव उत्प्रेरकांची विक्रीसाठी बंदी असलेली अंतरीम (Provisional) यादी’ प्राप्त झाली आहे. ज्या औषध कंपन्यांच्या जैव उत्प्रेरकांचे हंगामी/तात्पुरते नोंदणी परवाने संपले आहेत आणि ज्यांना खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार नवीन वैध उत्पादन व विक्री परवाना मिळालेला नाही, अशा सर्व औषधांची विक्री तात्काळ प्रभावाने रोखण्यात आली आहे. जर कोणत्याही कृषी सेवा केंद्रात अशा बेकायदेशीर औषधांचा साठा किंवा विक्री आढळली, तर खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत थेट कायदेशीर व फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा कडक इशारा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी दिला आहे.

❌ बंदी घालण्यात आलेल्या प्रमुख औषध कंपन्या आणि त्यांच्या औषधांची (Brands) यादी:
शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत यादीनुसार, एकूण ३७० नामांकित औषध उत्पादनांवर (Brands) बंदी घालण्यात आली आहे. त्यापैकी प्रमुख कंपन्या आणि त्यांच्या औषधांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
M/s Biostadt India Ltd. (बायोस्टॅड इंडिया लिमिटेड): बायोझाईम बीटी+ ग्रॅन्यूल (Biozyme BT+Granule), बायोझाईम पल्सेस+ लिक्विड, बायोझाईम क्रॉप+ लिक्विड, बायोझाईम फ्रूट+ लिक्विड, बायोझाईम पॉवर+ लिक्विड, बायोझाईम आलू+ ग्रॅन्यूल्स, बायोझाईम ग्रेन+ ग्रॅन्यूल्स, बायोझाईम ग्रॅन्यूल, ॲग्रोझाईम, बायोझाईम मिरची+ लिक्विड, बायोझाईम बीटी+ लिक्विड, अमेज-एक्स (Amaze-X), रिजॉईस डब्ल्यूजी (Rejoice WG), बायोझाईम सीड+ लिक्विड, बायोझाईम टी+ लिक्विड, बायोझाईम पॉवर+ ग्रॅन्यूल्स, बायोझाईम फ्रूट+ ग्रॅन्यूल्स, बायोझाईम व्हेजिटेबल+ लिक्विड.
M/s. Sumitomo Chemical India Ltd. (सुमितोमो केमिकल इंडिया लिमिटेड): लाटू (Laatu), दानझा पॉवर (Danza Power), हर्बोझाईम लिक्विड (Herbozyme Liquid), हर्बोझाईम ग्रॅन्यूल्स, हर्बोझाईम पॉवर ग्रॅन्यूल्स, एरोस (Aeros), मेक अप (Make up), मोबीसेल-एच (Mobicel-H).
M/s Criyagen Agri & Biotech Pvt. Ltd.: पोटॅशियम ह्युमेट ग्रॅन्यूल्स (PH 50), बायो-ह्युमेट लिक्विड, अमिनो-जी (Amino-G), अमिनो लिक्विड, मॅजिक (Magic), क्रिया-झाईम पीजीपीआर टॅब्लेट, क्रिया-झाईम ग्रॅन्यूल्स, क्रिया-झाईम लिक्विड, टोटल-२०.
M/s Karnataka Agro Chemicals (कर्नाटक ॲग्रो केमिकल्स): जिवरस (Jivras), समरस (Samras), नवजीवन-जी (Navajeevan-G), ग्रीन बूस्टर.
M/s Sea6 Energy Pvt. Ltd (सी६ एनर्जी): ॲग्रोगेम लिक्विड (Agrogain liquid), जिंगो एनएक्सजी (Jingo NXG), टोमा टफ (Toma Tough).
M/s. Gujarat Life Sciences (P) Ltd: बायोलाईफ (Biolife), जीएलएस-केल्प एक्स्ट्रॅक्ट, जीएलएस-अमिनोमिक्स, जीएलएस हॉट फेव्हरेट.
M/s Cropex Ltd. (क्रॉपेक्स लिमिटेड): जैविकोझाईम (Jaivizyme), बीएफएसएल, बीएफ-६एल (सीवीड), बीएफ-८एल (अमिनो ॲसिड).
M/s Jivagro Ltd (जिवाग्रो लिमिटेड): रॅपिग्रो लिक्विड (Rapigro Liquid), रॅपिग्रो ग्रॅन्यूल्स.
M/s Vital Crop Science Private Ltd.: फेना लिक्विड, पासात लिक्विड, लावा लिक्विड, ह्युमिगील ग्रॅन्यूल्स, ह्युमिगील लिक्विड, केल्प प्लस क्रिस्टल, ह्युमिगील प्रो लिक्विड.
M/s. Nava Bharath Fertilizers Ltd: विझाईम एल (Vizyme L), विझाईम जी, मोअर ६९, जेम्स बाँड.
M/s. Shivashakti Bio Technologies Ltd. (शिवशक्ती बायो टेक्नॉलॉजीस): ज्युपिटर ५ (Jupiter 5), विनग्रो एल (Vinngro L), झील (Jeel).
M/s. Shanmukha Agritech Ltd. (शन्मुखा ॲग्रिटेक): एकवीरा (Ekaveera), मोक्षा (Mokshaa), पासिदी ६, तेजस प्लस, टर्मिनेटर ११, किंगझाईम, किंगझाईम जी, धम्मन, जमींदार.
M/s. Poorva Chemtech Pvt. Ltd. (पूर्वा केमटेक): हूम-आर पावडर (Hoom-R Powder), हूम-आर लिक्विड, पी.सी. ग्रॅन्यूल्स, अक्वा-झाईम ग्रॅन्यूल्स, ग्रो-आर, फॉलीबूस्टर, ईझी स्टीम++, अमिग्रो.
M/s. Barrix Agro Sciences Pvt. Ltd: बॅरिक्स प्लँटचार्जर, बॅरिक्स रूटचार्जर.
M/s. Sun & Ocean Bio-care (India): ब्लॅक गोल्ड (Black Gold), बाँड जी-९, बायोडीया नवरत्न, ओजस, बोनस.
M/s. Samruddhi Chemicals Pvt. Ltd. (समृद्धी केमिकल्स): संपदाझाईम पावडर, नायट्रोकिक, केअर, समृद्धी-एल.
M/s. IRM Enterprises Pvt. Ltd.: कॅड ग्रो (CAD Grow P/L/G), कॅड मोअर एल, न्यूट्री कम्प्लीट एल.
M/s. Ganesh Chemical Industries: व्ही-टॉनिक ह्युमिक बेस्ड लिक्विड, व्ही-टॉनिक अमिनो बेस्ड लिक्विड.
M/s. SV Agro Solutions Pvt. Ltd (एस.व्ही. ॲग्रो सोल्यूशन्स): एसव्ही फ्रुटर, एसव्ही ५९, एसव्ही कॅन्टर, एसव्ही शुगरबन, एसव्ही साईझ बिल्डर, एसव्ही फुलोरा.
M/s. Ramcides Cropscience Pvt. Ltd.: ऑल विन गोल्ड सुपर (All win gold super), ऑल विन टॉप प्लस, ऑल विन वंडर प्लस.
M/s HI Gene Agro Sciences: किंग (King), न्यूटीजीन, रूट गोल्ड, हाय ह्युम, डायजेस्टर, जीनझाईम, फ्युजन, पॉवर ग्रो.
M/s Agrofil Industries (ॲग्रोफिल इंडस्ट्रीज): हरा सोना (Hara Sona), ॲग्रोव्हिटा, खनक, झंकार, सोनेरी, मास्टर माईंड, जीवन अमृत, ह्युमिकफिल.
M/s. Manisha Agro Sciences (मनिषा ॲग्रो सायन्सेस): मॅजिक जेल, ४ ॲक्शन, ह्युमराज एसपी, सावकार, क्लास, दिघा, पॉवर स्टीम, अचीव्ह, शेतधन, ॲग्रोपॉवर.
M/s. Sikko Industries Ltd. (सिक्को इंडस्ट्रीज): वकील (Vakil), सिग्नेटिक, वसूल, ब्लॅक सुरीया, भागमभाग, खंजर.
M/s. Farmsons Agri Solutions Pvt. Ltd.: बायो लूम, ड्रीप के प्लस, फ्लो बहार, फ्लो ग्रो, फोटॉन एक्स, अमिनासिल, बायो स्कॉर्ट, रेडिकल लिक्विड.
M/s. Tricon Biochem Corporation: त्रिरिच प्लस, युनिरिच, विमिंटा सुपर, सॉईल एक्स्पर्ट जी, व्हाईटरूट, रूटशक्ती, ट्रायअमिनो.
M/s New Malwa Agritech Corporation: ह्युमिकगेट एसपी/जीआर, भू वरदान, संजीवनी गोल्ड, मणिरतन, अमिनो+.
📢 शेतकऱ्यांना व विक्रेत्यांना आवाहन:
अवैध व विनापरवाना औषध विक्रीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याने वरील यादीतील औषध खरेदी करू नये आणि कृषी सेवा केंद्रांनी त्यांची विक्री तात्काळ थांबवावी. आदेशाचे उल्लंघन केल्यास कृषी अधिकाऱ्यांमार्फत परवाना निलंबन तसेच थेट खोजदारी गुन्हे (Criminal Action) दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात येत असल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

❌ बंदी घातलेली जैव उत्प्रेरके (Bio-stimulants) उत्पादन करणाऱ्या सर्व कंपन्यांची यादी:
M/s Biostadt India Ltd. (बायोस्टॅड इंडिया लिमिटेड)
M/s. Sumitomo Chemical India Ltd. (सुमितोमो केमिकल इंडिया लिमिटेड)
M/s Criyagen Agri & Biotech Pvt. Ltd. (क्रियाजेन ॲग्री अँड बायोटेक)
M/s Karnataka Agro Chemicals (कर्नाटक ॲग्रो केमिकल्स)
M/s Sea6 Energy Pvt. Ltd. (सी६ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड)
M/s. Gujarat Life Sciences (P) Ltd. (गुजरात लाईफ सायन्सेस)
M/s Cropex Ltd. (क्रॉपेक्स लिमिटेड)
M/s Jivagro Ltd. (जिवाग्रो लिमिटेड)
M/s Vital Crop Science Private Ltd. (व्हाइटल क्रॉप सायन्स)
M/s. Nava Bharath Fertilizers Ltd. (नवा भारत फर्टिलायझर्स)
M/s. Shivashakti Bio Technologies Ltd. (शिवशक्ती बायो टेक्नॉलॉजीस)
M/s. Shanmukha Agritech Ltd. (शन्मुखा ॲग्रिटेक लिमिटेड)
M/s. Poorva Chemtech Pvt. Ltd. (पूर्वा केमटेक प्रायव्हेट लिमिटेड)
M/s. Barrix Agro Sciences Pvt. Ltd. (बॅरिक्स ॲग्रो सायन्सेस)
M/s. Sun & Ocean Bio-care (India) (सन अँड ओशन बायो-केअर)
M/s. Samruddhi Chemicals Pvt. Ltd. (समृद्धी केमिकल्स)
M/s. IRM Enterprises Pvt. Ltd. (आय.आर.एम. एंटरप्रायझेस)
M/s. Ganesh Chemical Industries (गणेश केमिकल इंडस्ट्रीज)
M/s. SV Agro Solutions Pvt. Ltd. (एस.व्ही. ॲग्रो सोल्यूशन्स)
M/s. Ramcides Cropscience Pvt. Ltd. (रामसाईड्स क्रॉपसायन्स)
M/s HI Gene Agro Sciences (हाय जीन ॲग्रो सायन्सेस)
M/s Agrofil Industries (ॲग्रोफिल इंडस्ट्रीज)
M/s. Manisha Agro Sciences (मनिषा ॲग्रो सायन्सेस)
M/s. Sikko Industries Ltd. (सिक्को इंडस्ट्रीज लिमिटेड)
M/s. Farmsons Agri Solutions Pvt. Ltd. (फार्मसन्स ॲग्री सोल्यूशन्स)
M/s. Tricon Biochem Corporation (ट्रायकॉन बायोकेम कॉर्पोरेशन)
M/s New Malwa Agritech Corporation (न्यू मालवा ॲग्रिटेक कॉर्पोरेशन)
📋 नोंद: बातमीमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राहण्यासाठी मूळ पत्रातील सर्व २७ कंपन्यांची नावे जशीच्या तशी समाविष्ट केली आहेत.
- खबरनामा न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर




