Breaking
उठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषीवार्ताजिल्हाधिकारीतहसीलतहसीलदार नेवासातालुका कृषी अधिकारीनेवासा मतदार संघ आमदार विठ्ठलराव लंघे साहेबनेवासा विधानसभा आमदार विठ्ठलरावजी लंघे साहेबपंचनामापालकमंत्री राधाकृष्ण विखेपूरग्रस्तांना मदत वाकडीब्रेकिंगमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईशिवसेना

*ब्रेकिंग न्यूज — खबरनामा न्यूज नेटवर्क*🌾 *आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना दिलासा —* तहसीलदारांचा आदेश मागे घेण्याची प्रक्रिया सुरू

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती अखेर दूर होणार आहे.

0 6 2 0 6 3

📰 *ब्रेकिंग न्यूज — खबरनामा न्यूज नेटवर्क* 

🌾 *आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना दिलासा —* तहसीलदारांचा आदेश मागे घेण्याची प्रक्रिया सुरू!

 

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती अखेर दूर होणार आहे.

तहसीलदार कार्यालयाने नुकतेच एक पत्र काढून स्थानिक सहकारी साखर कारखान्यांकडून कर्जासाठी घेतलेल्या भांडवल सर्टिफिकेटच्या आधारे नोंदी मागवण्याचे निर्देश दिले होते. या आदेशामुळे अशा शेतकऱ्यांना — ज्यांच्या शेतात सध्या कापूस लागवड आहे पण त्यांनी भांडवलासाठी कारखान्यातून सर्टिफिकेट घेतले होते — नुकसानग्रस्त पंचनाम्यातून वगळले जाईल अशी भीती निर्माण झाली होती.

या अन्यायकारक परिस्थितीकडे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तात्काळ लक्ष घातले.

भ्रमणदूरध्वनीद्वारे प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकारी (कलेक्टर) यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की —

> “शेतकऱ्यांनी भांडवल उभारण्यासाठी साखर कारखान्यातून सर्टिफिकेट घेतले असले, तरी त्याचा त्यांच्या प्रत्यक्ष शेतीतील नुकसानाशी काहीही संबंध नाही.

त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पंचनाम्यापासून किंवा शासकीय मदतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे.

पंचनामा झाला पाहिजे आणि नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. माझ्या शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली पाहिजे!”

आमदार लंघे पाटील यांच्या ठाम भूमिकेनंतर प्रशासनाने हा निर्णय मागे घेण्याचे संकेत दिले आहेत.

प्रांत अधिकारी आणि कलेक्टर यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे कळते.

 *📍 नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचा दिलासा!* 

 *💬 “भांडवल सर्टिफिकेट घेणे गुन्हा नाही — शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नका” — आमदार लंघे पाटील* 

खबरनामान्यूज ने पहिली बातमी लावली होती शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात या बातमीचा इफेक्ट आणि आमदारांनी घेतली नोंद आणि ताबडतोब कारवाई

# *नेवासा #शेतकरीहित #विठ्ठलरावलंघेपाटील #FarmerRelief #खबरनामान्यूज #KhabarnamaNews #MarathaNews #CottonFarmers #TalukaNevasa*

🖊️ *नरेंद्र काळे/ नेवासा*

1.5/5 - (4 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 0 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे