Breaking
आमदार विठ्ठलराव लंघे नेवासाआमदार शंकरराव गडाखई-पेपरक्रिडा व मनोरंजनक्रीडा वार्तानेवासानेवासा तालुकापोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगमयुरेश्वर पावन गणपती मंडळ नवीन चांदगावविशेष निवडशिबिर

श्री मयुरेश्वर पावन देवस्थान यात्रा : भक्ती, संस्कृती, संघटन आणि विकासाचा उत्सव

पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती व मान्यवरांच्या भेटीने यात्रेला शोभाटांगा गाडी शर्यत, ऑर्केस्ट्रा व विविध उपक्रमांतून उत्साहपूर्ण आयोजन

0 6 2 0 6 3

श्री मयुरेश्वर पावन देवस्थान यात्रा : भक्ती, संस्कृती, संघटन आणि विकासाचा उत्सव*

:

 पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती व मान्यवरांच्या भेटीने यात्रेला शोभा

 टांगा गाडी शर्यत, ऑर्केस्ट्रा व विविध उपक्रमांतून उत्साहपूर्ण आयोजन

 घेवरी–नवीन चांदगाव | प्रतिनिधी

पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेल्या श्री मयुरेश्वर पावन देवस्थान, घेवरी–नवीन चांदगाव येथे आयोजित वार्षिक यात्रा महोत्सव यंदा भक्ती, संस्कृती, सामाजिक एकात्मता आणि गावविकासाचा आदर्श ठरला . कार्यक्रम पत्रिकेनुसार नियोजित केलेले सर्व धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम शांत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

👇👇येथे लिंक ला क्लिक करून सविस्तर बातमी पहा खबरनामा यूट्यूब चैनल वर👇👇👇

धार्मिक कार्यक्रमांतून भक्तिमय वातावरण

महंत गुरुवर्य सुनील गिरीजी महाराज (श्रीराम साधना आश्रम), महंत गुरुवर्य रमेशानंद गिरीजी महाराज (त्रिवेनेश्वर देवस्थान), महंत गुरुवर्य गोपालगिरी महाराज (मुकाई देवस्थान, उस्थळ दुमाला), महंत गुरुवर्य जगदीश गिरी महाराज (नवीन चांदगाव), हरिभक्त परायण मंगेशजी महाराज वाघ तसेच हरिभक्त परायण विष्णूदास महाराज सांगळे यांच्या पावन उपस्थितीत आणि माननीय आमदार विठ्ठलरावजी लंघे यांच्या शुभहस्ते अत्यंत भक्तीभावाने धर्मध्वज पूजन व ध्वजारोहण विधी संपन्न झाला. संत-महंतांच्या आशीर्वचनांनी परिसर भक्तिमय झाला असून धर्म, संस्कार व एकतेचे प्रतीक असलेल्या या सोहळ्याने उपस्थित भाविकांमध्ये आध्यात्मिक चेतना निर्माण केली.

 यात्रेदरम्यान गणेशाची विधिवत पूजा, अभिषेक, सकाळ-संध्याकाळची महाआरती, भजन-कीर्तन यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पंचक्रोशीतील सर्व गावांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत गणरायाच्या चरणी श्रद्धा अर्पण केली.

टांगा गाडी शर्यत व ऑर्केस्ट्राने यात्रेला रंगत

 कार्यक्रम पत्रिकेतील ठळक आकर्षण ठरलेली टांगा गाडी शर्यत* *उत्साहात पार पडली.तसेच रात्री आयोजित ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाने यात्रेला सांस्कृतिक रंगत प्राप्त करून दिली.

यासोबतच लहान मुलांसाठी खेळणी, विविध मनोरंजनात्मक उपक्रम व स्टॉल्स यामुळे सर्व वयोगटातील भाविकांसाठी ही यात्रा आनंदाचा उत्सव ठरली.

 मान्यवरांची उपस्थिती यात्रेसाठी प्रेरणादायी

या यात्रेस नामदार विठ्ठलराव लंघे, माजी सभापती किशोर जोजार, नेवासा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, तसेच नेवासा शहराचे आधारस्तंभ नंदकुमार पाटील यांनी भेट देऊन देवदर्शन घेतले.तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व नगरपंचायत चे नगराध्यक्ष डॉक्टर करण घुले हेहीसुरेश नगरचे सरपंच कल्याण उभेदळ उपस्थित होते

याशिवाय अनेक नामवंत व प्रतिष्ठित व्यक्तींनी येथेशिवसेना नेते भाऊसाहेब वाघ,प्रकाश निपुंगे भेट दिली. नाव घेण्यासारखे अनेक मान्यवर असले तरी प्रत्येक भाविकाची उपस्थिती ही मयुरेश्वर गणपती मंडळासाठी ऊर्जा देणारी ठरली, अशी भावना व्यक्त होत होती.

उंदरे पाटील परिवार व तरुणांचे विशेष योगदान

या यात्रा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी उंदरे पाटील परिवार, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले. यात्रेचे नियोजन, स्वच्छता, शिस्त व व्यवस्था सांभाळण्यासाठी तरुण वर्गाने विशेष परिश्रम घेतले, त्यामुळे यात्रा यशस्वीरीत्या पार पडली.

 घेवरी–नवीन चांदगाव : विकासाचे नवे उदाहरण

घेवरी–नवीन चांदगाव हे अल्पावधीत पुनर्वसित झालेले गाव असून आज पंचक्रोशीत विकासाचे उदाहरण म्हणून ओळखले जात आहे.

 गावाचा कारभार संयुक्त,नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने चालविला जात असून यामध्ये उंदरे पाटील परिवाराचे भरीव योगदान मोलाचे ठरले आहे.

 आठवडे बाजारामुळे पंचक्रोशीचे केंद्रबिंदू

या गावात आठवडे बाजार भरत असल्याने पंचक्रोशीतील सर्व गावांतील नागरिक या बाजारासाठी येथे येतात. त्यामुळे गावाची आर्थिक व सामाजिक चळवळ अधिक गतिमान झाली आहे.

 मयुरेश्वर तरुण मंडळाची सक्रिय भूमिका

गावातील विविध सामाजिक, धार्मिक व विकासात्मक उपक्रम मयुरेश्वर तरुण मंडळ या नवतरुण संघटनेच्या माध्यमातून राबविले जात आहेत. संघटित व लोकसहभागातून गावाचा कारभार पुढे नेण्याचे काम हे मंडळ करत आहे.

सर्वांचे सहकार्य, यात्रेचे यश

या संपूर्ण आयोजनासाठी सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच पदाधिकारी, स्वयंसेवक व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

श्री मयुरेश्वर पावन देवस्थान ट्रस्ट व मयुरेश्वर तरुण मंडळाच्या वतीने यात्रेस तसेच गावविकासाच्या उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.तसेच प्रत्येक अंगारकी चतुर्थीला किंवा गणेश जयंतीला आणि चतुर्थीला अन्नदानाचा कार्यक्रम मंडळाकडून होत असतो यावेळी बाबुळखेडा तसेच नारायणवाडी उस्थळ दुमाला नवीन चांदगाव येथील पंचक्रोशीतील अनेकांचे योगदान असते अनेक भक्तगण महाप्रसादासाठी येत असतात हा उपक्रम त्यांचा प्रत्येक चतुर्थीला असतो

2.7/5 - (3 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 0 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे