मी शेवगावकर”चा दणका मोडला मतदारांना गृहीत धरणाऱ्या गावपुढाऱ्यांचा मणका मोडण्याची तयारी?
शिवसेनेचा बाण आता कोणाला घायाळ करणार…!** **15 जानेवारीला नगरपरिषदेत मोठा राजकीय भूकंप?


“मी शेवगावकर”चा दणका मोडला
मतदारांना गृहीत धरणाऱ्या गावपुढाऱ्यांचा मणका मोडण्याची तयारी?
शिवसेनेचा बाण आता कोणाला घायाळ करणार…!**
**15 जानेवारीला नगरपरिषदेत मोठा राजकीय भूकंप?
उपनगराध्यक्ष पद व समित्यांच्या निवडीत नाट्यमय फेरबदलाचे संकेत**
📍 शेवगाव | प्रतिनिधी : अविनाश देशमुख
📞 9960051755 / 9270442511
🗓️ दिनांक : 12 जानेवारी 2025 | सोमवार
शेवगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या संमिश्र कौलामुळे शहरातील राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
नगराध्यक्ष पदावर शिवसेना (शिंदे गट) तर नगरसेवक संख्येच्या बाबतीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) आघाडीवर असून, भाजप व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना माफक यश मिळाले आहे.
स्वतंत्र गट नोंदणी… पण मुंबईत घडली वेगळीच राजकीय खेळी
निकालानंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपने स्वतंत्र गट नोंदणी करून सत्ता स्थापनेची बाजी मारल्याचे चित्र होते.
मात्र त्यानंतर अहिल्यानगर येथील मोनिकाताई राजळे यांच्या निवासस्थानी मनोमिलन झाल्याने संपूर्ण राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत.
मुंबईत मध्यरात्री हालचाली… शेवगाववर परिणाम निश्चित?
खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एका वजनदार नेत्यासोबत दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री गुप्त बैठक घेतली.
या बैठकीत –
दोन्ही पक्षांतील नाराज नगरसेवकांचा वेगळा गट
13 जानेवारीला गट स्थापन
14 जानेवारीला स्वीकृत नगरसेवकांची निवड
15 जानेवारीला उपनगराध्यक्ष पद व विविध समित्यांच्या निवडी
यामध्ये मोठे नाट्यमय बदल घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला मिळाली आहे.
यामुळे,
👉 “एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण आता तालुक्यातील कोणत्या वजनदार नेत्याचा वेध घेतो?”
याची खमंग चर्चा शेवगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात रंगू लागली आहे.
🔴 ताजे कलम
शेवगाव–पाथर्डी पट्ट्यातील कधी काळचे कट्टर राजकीय शत्रू अचानक मित्र झाल्याने अनेक नगरसेवकांमध्ये कुजबुज सुरू आहे.
👉 “याच राजकीय उलथापालथीचा फायदा शिवसेनेने घेतला नाही ना?”
👉 “आता कोण कोणाच्या गाडीत बसून ‘फरार’ होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!”
क्रमशः…
✍️ अविनाश देशमुख, शेवगाव
खबरनामा न्यूज प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार




