Breaking
जिल्हा परिषद अहिल्यानगरजिल्हा परिषद शाळा उपक्रमनेवासाबालदिन साजरा गेवराई नेवासाब्रेकिंगवारकरी सांप्रदायविशेष निवडशिक्षण विभाग पुणेशिबिरशिवसेना

✨ बालदिनानिमित्त श्रीकृष्ण बहुउद्देशीय संस्थेकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप ✨

उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर

0 6 0 6 2 8

बालदिनानिमित्त श्रीकृष्ण बहुउद्देशीय संस्थेकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप ✨

 

उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर

 

गेवराई (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) — बालदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गेवराई येथे श्रीकृष्ण बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित खाऊ वाटप उपक्रम उत्साहात पार पडला.

 

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री सोपानराव कर्डिले, सदस्य बाबासाहेब आदमने, तसेच दिलीप आदमाने, निलेश साळूंके, निलेश कर्डीले, विवेक कर्डीले, अनिकेत कर्डीले आणि काका आदमाने हे मान्यवर विशेष उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक श्री नवनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी शिक्षक सर्वश्री बापूसाहेब सोनवणे, जयप्रकाश राशीनकर, शिवराज जाधव, दत्तात्रय नवगिरे, प्रमोद देशमुख तसेच मोरे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 

बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली होती. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बापूसाहेब सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दत्तात्रय नवगिरे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे