Breaking
ई-पेपरडाँ तेजश्रीताई लंघे जिल्हा परिषद सदस्यतहसीलदार नेवासादेवगड देवस्थान गुरुवर्य भास्करगिरी महाराजनेवासा विधानसभा आमदार विठ्ठलरावजी लंघे साहेबब्रेकिंगशिवसेनासांस्कृतिक कार्यक्रम

श्री पावण गणपती देवस्थान, शिरसगाव सुशोभीकरणासाठी १५ लाखांची भरीव मदत

मा. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे भाविकांकडून अभिनंदन

0 6 0 6 2 2

 

श्री पावण गणपती देवस्थान, शिरसगाव सुशोभीकरणासाठी १५ लाखांची भरीव मदत

मा. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे भाविकांकडून अभिनंदन

नेवासा प्रतिनिधी:- शिरसगाव येथील श्रद्धास्थान असलेल्या श्री पावण गणपती देवस्थानाच्या सुशोभीकरणासाठी मा. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

हे श्री पावण गणपती देवस्थान शिरजगाव येथील प्रसिद्ध श्री जगदंबा माताजी मंदिराच्या सान्निध्यात, अगदी जवळच वसलेले असून, परिसरातील भाविकांसाठी हे अत्यंत पावन आणि श्रद्धेचे केंद्र मानले जाते. अनेक कुटुंबांसाठी हे मंदिर कुलदैवताचे स्थान असून येथे वर्षभर विविध धार्मिक विधी, उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आयोजित केले जातात.

या निमित्ताने मा. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या उपस्थितीत श्री गणपतीचा विधिवत अभिषेक संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

श्री पावण गणपती देवस्थान हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्याचेही केंद्र असून येथे भव्य मंदिर, प्रशस्त सभामंडप, उत्तम मंगल कार्यालय तसेच मुबलक व नियोजनबद्ध पाणी व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे परिसरातील विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भाविकांचा मोठा ओघ असतो.

मा. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी यापूर्वीही या देवस्थानासाठी सातत्याने भरीव योगदान दिले असून, भाविकांच्या श्रद्धेला व परंपरेला बळ देणारी विकासाभिमुख भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. सुशोभीकरणासाठी दिलेला १५ लाखांचा निधी हा त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचा ठोस प्रत्यय असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

या वेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी “कर्तव्यदक्ष आमदार म्हणजे काय, याची खरी प्रचिती या निमित्ताने मिळाली” अशा शब्दांत मा. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला.

देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी मिळालेल्या या भरीव मदतीबद्दल पंचक्रोशीतील भाविकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी पावन गणपती देवस्थानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते व तसेच गणपती परिसरात नेहमीच संस्कृती व धार्मिक कार्यक्रम आयोजन करीत असतात त्यामुळे हा निधी निश्चितच सुशोभीकरण  खर्च योग्य निर्णय असल्याची कमिटीने सांगितली त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा आभार व्यक्त करून अभिनंदनचा ठराव संमत करून पुढील कार्य त्यांना शुभेच्छा देण्यात आले यावेळी अनेक ग्रामस्थ पंचक्रोशीतील उपस्थित होते

🙏🌹🙏

3/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे