नांगर खांद्यावर… स्वातंत्र्याच्या दिशेने एक पदयात्री!”
लातूर: जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील धानोरा गावचे सहदेव व्होनाळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी चालवलेली पदयात्रा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

“नांगर खांद्यावर… स्वातंत्र्याच्या दिशेने एक पदयात्री!”
लातूर: जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील धानोरा गावचे सहदेव व्होनाळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी चालवलेली पदयात्रा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
शेतकरी असो वा माजी प्राध्यापक, शासकीय सेवक असो वा पत्रकार – ही सर्व ओळख बाजूला ठेवून सहदेव व्होनाळे यांनी एका जळजळीत प्रश्नाची दखल घेतली आहे. कधी काळी विद्यापीठात पत्रकारिता शिकवणारे, अनेक वर्षे पत्रकारिता करणारे, सुरेश पुरी सर, महारुद्र मंगनाळे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांशी नाते असलेले सहदेव व्होनाळे हे आज नांगर खांद्यावर घेऊन मुंबईच्या दिशेने पायी पदयात्रा करत आहेत.
सर्व पावले जिथे पंढरपूरकडे वळतात, तिथे हे एकटे पाऊल मात्र शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी सरकारच्या राजधानीकडे निघाले आहे.
हडोळती गावातील एका शेतकऱ्याच्या नांगराला स्वतः जुंपून नांगरणी करतानाचा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारने त्या शेतकऱ्याला ४० हजार रुपयांची मदत दिली होती. परंतु, लाखो शेतकरी अजूनही दुर्लक्षितच आहेत. त्यांचाही आवाज सरकारने ऐकावा यासाठी सहदेव व्होनाळे यांनी ही पदयात्रा सुरू केली आहे.
संपर्कात आलेल्या व्यक्तींचा समावेश, पदवीत्तर शिक्षण, विचारपूर्वक निर्णय, आणि शेतकरी प्रश्नां विषयीची तळमळ हे या पद यात्रच्या वाटचालीला एक वेगळीच उंची देतात.
खबरनामा न्यूज च्या संपादक नरेंद्र काळे यांच्याशी बोलताना सहदेव व्होनाळे यांनी त्यांच्या मागील काही सभा ऐकल्या असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे “शेतकरीविरोधी कायदे” ही पुस्तिका देण्यात आली असून त्यांनी ती अभ्यासपूर्वक वाचून यापुढील आंदोलनात वापरण्याचे आश्वासन दिले आहे.
🪔 सहदेव भाऊंना शुभेच्छा!
शेतकऱ्यांच्या हातापायातील गुलामीची बेडी तुटो…
शेतकरी स्वतंत्र होवो!
जय शेतकरी! जय महाराष्ट्र!




