रामनगर मुकिंदपूर येथे ‘भव्य श्रीराम जन्म सोहळा’ व कीर्तन महोत्सव
पाच दिवस रंगणार भक्तीचा जागर


रामनगर मुकिंदपूर येथे ‘भव्य श्रीराम जन्म सोहळा’ व कीर्तन महोत्सव
पाच दिवस रंगणार भक्तीचा जागर
मुकिंदपूर (विशेष प्रतिनिधी):
नेवासा तालुक्यातील श्रीराम साधना आश्रम, रामनगर मुकिंदपूर येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने आणि विविध संत-महंतांच्या सान्निध्यात ‘भव्य श्रीराम जन्म सोहळा, कीर्तन महोत्सव, श्रीराम महायज्ञ व अभिषेक सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार २३ मार्च ते शुक्रवार २७ मार्च २०२६ या कालावधीत हा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तीभावात पार पडणार असून परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
संत-महंतांची मार्गदर्शक उपस्थिती
या महोत्सवाचे आयोजन संस्थापक महंत सुनिलगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या सोहळ्यास प.पू. गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान) यांची विशेष प्रेरणा लाभली आहे.
तसेच कार्यक्रमास
महंत ओंकारगिरीजी महाराज (हरिद्वार)
महंत काशिगिरीजी महाराज (वसई)
ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के
ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक
यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक
📿 १९ मार्च (गुरुवार)
दुपारी ४:०० – गुढीपाडव्यानिमित्त धर्मध्वज पूजन
🎤 २३ मार्च (सोमवार)
सायं. ७ ते ९ – ह.भ.प. प्रदीप महाराज नलावडे (लोणंद) यांचे कीर्तन
🎤 २४ मार्च (मंगळवार)
सायं. ७ ते ९ – ह.भ.प. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर (नाशिक) यांचे कीर्तन
🙏 २५ मार्च (बुधवार)
सकाळी १०:०० – ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट व प्रवचन
सायं. ७ ते ९ – ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत (गंगापूर) यांचे कीर्तन
🎉 २६ मार्च (गुरुवार)
सकाळी १० ते १२ – महंत परमहंस मुक्तानंद महाराज (वेल्हाळे, संगमनेर) यांच्या उपस्थितीत मुख्य श्रीराम जन्म सोहळा
सायं. ७ ते ९ – ह.भ.प. मच्छिंद्र महाराज निकम (सलाबतपूर) यांचे कीर्तन
📖 २७ मार्च (शुक्रवार)
सकाळी १० ते १२ – भागवताचार्य साध्वी सुवर्णानंद चैतन्य यांचे काल्याचे कीर्तन
त्यानंतर महाप्रसाद
जंगी कुस्त्यांचा हंगामा
सोहळ्याच्या सांगता दिनी म्हणजे २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता
श्रीमती सुमतीताई साहेबराव घाडगेपाटील यांच्या सौजन्याने जंगी कुस्त्यांची दंगल (हंगामा) आयोजित करण्यात आली आहे.
या सर्व धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्रीराम साधना आश्रम, रामनगर मुकिंदपूर व भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे




