भास्कर दामोदर मोटकर यांचे आवाहन :
मी भास्कर दामोदर मोटकर, पुणतांबा (ता. राहाता, जि. अहमदनगर). आमच्या पुणतांबा गावाने पहिले खासदार व आमदार दिलेले आहे. गेले 38 वर्षे मी शिवसेना या संघटनेत "८०% समाजकारण आणि २०% राजकारण" या बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन कार्य केले.

भास्कर दामोदर मोटकर यांचे आवाहन :
“घराणेशाहीला न जुमानता मराठा समाजाच्या हक्कासाठी उभे राहा”
राहाता तालुका प्रतिनिधी
मी भास्कर दामोदर मोटकर, पुणतांबा (ता. राहाता, जि. अहमदनगर). आमच्या पुणतांबा गावाने पहिले खासदार व आमदार दिलेले आहे. गेले 38 वर्षे मी शिवसेना या संघटनेत “८०% समाजकारण आणि २०% राजकारण” या बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन कार्य केले.
सन 2023 मध्ये मराठा आरक्षणासाठी शांततामय संविधानिक आंदोलन करणाऱ्या मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर अमानुष लाठीचार्ज व गोळीबार झाला. त्या दिवसापासून मी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे दादांच्या पाठीशी उभा आहे.
मनोज दादा जरांगे पाटील यांना मी जवळून पाहिले आहे. त्यांना राजकारणाची कुठलीही अपेक्षा किंवा स्वार्थ नाही. फक्त दीड एकर वावर व तीन पत्र्याचे घर असूनही, महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते त्यांना भेटले; परंतु त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यांच्या रक्तात तडजोड नाही, समाजासाठीच लढा आहे.
गेल्या अनेक दशकांच्या राजकीय वाटचालीत मी अनुभवले आहे की, घराणेशाहीची घाणेरडी पाळेमुळे आपल्या तालुक्यातही खोलवर गेलेली आहेत.
कोपरगाव, श्रीरामपूर, राहता, संगमनेर या भागात घराणेशाही मुळे सर्वसामान्य गोरगरीबांना संधीच मिळत नाही.
आमचा राहाता तालुका यात तर सर्वात भयानक परिस्थितीत आहे.
प्रत्येक गावात-तालुक्यात काही ठराविक घराणी आपली पकड ठेवून, तरुणाईचे नैसर्गिक स्वप्नसुद्धा गहाण ठेवत आहेत.
खोटे व्हॉट्सअॅप ग्रुप, भूलथापा आणि बगलबच्चे यांच्या माध्यमातून जनतेला फसवले जाते.
आजचीच वेळ योग्य आहे –
👉 पुढच्या पिढ्यांना घराणेशाहीच्या बेडीत अडकवू नका.
👉 गोरगरिबांच्या लेकरांनाही पुढे येऊ द्या.
👉 तालुक्यात खरी लोकशाही प्रस्थापित व्हावी हीच अपेक्षा.
“समाजकारणातून परिवर्तन घडवा, घराणेशाहीला पायउतार करा”
— आ. भा. दा. मोटकर 🙏🏻
खबरनामा न्यूज प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली




