शेगावच्या गायत्री रोहनकरला “मिस एशिया वर्ल्ड 2025” चा मुकुट – महाराष्ट्राचा सन्मान जागतिक स्तरावर
दुबई येथील ब्रिस्टोल हॉटेल, देरा येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत "मिस एशिया वर्ल्ड 2025" चा बहुमान पटकावून शेगावच्या गायत्री रोहनकर हिने महाराष्ट्राचं आणि विशेषतः बुलढाणा जिल्ह्याचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केलं आहे.

दिनांक: ९ जुलै २०२५
स्थान: शेगाव, बुलढाणा जिल्हा
शेगावच्या गायत्री रोहनकरला “मिस एशिया वर्ल्ड 2025” चा मुकुट – महाराष्ट्राचा सन्मान जागतिक स्तरावर
दुबई येथील ब्रिस्टोल हॉटेल, देरा येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत “मिस एशिया वर्ल्ड 2025” चा बहुमान पटकावून शेगावच्या गायत्री रोहनकर हिने महाराष्ट्राचं आणि विशेषतः बुलढाणा जिल्ह्याचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केलं आहे.
स्पर्धेत विविध आशियाई देशांतील सौंदर्यवतींना मागे टाकत गायत्रीने आत्मविश्वास, सौंदर्य, वक्तृत्व व सामाजिक भान यांच्या जोरावर हा किताब पटकावला. तिच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान उंचावला असून मराठी अस्मितेचा झेंडा जगभर फडकावला गेला आहे.
गायत्रीने या स्पर्धेत मिळवलेलं यश हे केवळ वैयक्तिक नव्हे तर ग्रामीण भागातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे. तिने आपल्या मेहनतीने, चिकाटीने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने ही सर्वोच्च कामगिरी केली आहे.
खास उल्लेखनीय बाब म्हणजे:
गायत्री ही बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या छोट्याशा गावातील असून, अत्यंत साध्या घरातून आलेली आहे. तिच्या या यशामुळे आज शेकडो युवक-युवतींना नवे स्वप्न, नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे.
खबरनामा न्यूजच्या वतीने गायत्री रोहनकरचे मन:पूर्वक अभिनंदन!
तिच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 🌟🇮🇳👑
—
प्रस्तुती:
नरेंद्र पाटील काळे
मुख्य संपादक – खबरनामा न्यूज नेटवर्क
www.khabarnamanews.in




