शेतकरी संघटना कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक – श्री क्षेत्र देवगड येथे संपन्न होणार
स्थान: श्री क्षेत्र देवगड, छ. संभाजीनगर व अहिल्यानगरच्या मध्ये, हायवेपासून ५ कि.मी. अंतरावर 📅 दिनांक: १९ व २० जुलै २०२५ 💬 आयोजक: शेतकरी संघटना

शेतकरी संघटना कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक – श्री क्षेत्र देवगड येथे संपन्न होणार
📍 स्थान: श्री क्षेत्र देवगड, छ. संभाजीनगर व अहिल्यानगरच्या मध्ये, हायवेपासून ५ कि.मी. अंतरावर
📅 दिनांक: १९ व २० जुलै २०२५
💬 आयोजक: शेतकरी संघटना
शेतकरी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवरील कार्यकारिणीची अत्यंत महत्त्वाची बैठक श्री क्षेत्र देवगड येथे आयोजीत करण्यात आली आहे. सदर बैठकीत खालील विषयांवर चर्चा व निर्णय अपेक्षित आहेत:
🔹 राष्ट्रीय, राज्यस्तरीय व स्थानिक पातळीवरील आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीचे आकलन आणि त्यानुसार प्रतिक्रिया स्वरूपातील धोरणात्मक भूमिका
🔹 तंत्रज्ञान सत्याग्रह – सविनय कायदेभंगाची अधिक प्रभावी कल्पना
🔹 कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थेच्या बाहेर शेतमाल खरेदी-विक्रीचे पर्यायी मार्ग – चतुरंग शेती आणि वायदे बाजारातील बंधनांवर संघर्ष
🔹 लक्ष्मी मुक्ती अभियानावर विचारविनिमय
🔹 शेतीतील सरकारी हस्तक्षेप कमी करण्याबाबत धोरणात्मक दिशा
🔹 कर्जमुक्ती विरुद्ध कर्जमाफी – नवे दृष्टिकोन व पतपुरवठा धोरण
🔹 शरद जोशी स्मारकासाठी नवीन कल्पनांची मांडणी
🔹 संघटनात्मक बांधणी – शिस्तबद्ध विस्तार योजना
🔹 उच्चाधिकार समितीच्या सहमतीने इतर विषय
सूचना:
१. भोजनाची व्यवस्था श्री क्षेत्र देवगड दत्तात्रय संस्थानच्या वतीने करण्यात आली असून ₹६०/- शुल्क आहे.
२. १९ व २० तारखेच्या रात्रीचा मुक्काम ‘भक्त निवास’ येथे आयोजित आहे.
३. कार्यकारिणी सदस्यांची नोंदणी शुल्क ₹१००/- ठेवण्यात आले आहे.
४. नवीन विषय सुचवण्यासाठी कृपया अध्यक्षा यांच्याशी संपर्क साधावा – 📞 ९७६५४७०००२
कार्यकारिणी सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून निर्णय प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
शेतकरी संघटना
– जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी




