ऊस्थळ दुमाला सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा
सर्वानुमते ठराव : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, पिक भरपाई आणि नैसर्गिक शेतीला प्राधान्य

ऊस्थळ दुमाला सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा

सर्वानुमते ठराव : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, पिक भरपाई आणि नैसर्गिक शेतीला प्राधान्य
ऊस्थळ दुमाला विविध सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत पार पडली. सभेचे माननीय अध्यक्षपद सोसायटीचे चेअरमन विलास आसाराम काकडे यांनी भूषवले. व्हाईस चेअरमन वच्छलाबाई ज्ञानदेव दिघे, पंचकमिटी सदस्य राजेंद्र पंढरीनाथ गायकवाड, देविदास मारुती वाघ, त्रिंबक काशिनाथ सुकाळकर, नामदेव गोरक्षनाथ सुकाळकर, जनार्धन पिराजी पिटेकर, मोहन भिकाजी सकट, सिंधुबाई ज्ञानदेव धानापुणे, कांताबाई रावसाहेब आठरे, बद्रीनाथ नामदेव चिंधे, राधाकिसन जगन्नाथ वाघ, सुरेश सारंगधर सुकाळकर यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते.

संस्थेचे सचिव एस. बी. पंडुरे व सेवक वर्ग यांच्या सहाय्याने सभा पार पडली.
सभेत शेतकरी संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष त्रिंबक भदगले यांच्या सुचने ला राजेंद्र गायकवाड यांनी अनुमोदन दिले. चेअरमन व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत खालील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले –
शेतकरी कर्ज मुक्तीसाठी शासनाकडे सरसकट सातबारा कोरा करण्याची मागणी
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची सातबारा क्षेत्र निहाय शासकीय भरपाई द्यावी
मानवी व शेतकऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी नैसर्गिक, सेंद्रिय व विषमुक्त शेतीला प्राधान्य द्यावे
सभासदांना सहकारी सोसायटी मार्फत सेंद्रिय शेतीसाठी आर्थिक तरतूद करावी
सभासदांच्या हक्क, हित व आरोग्याशी निगडित या ठरावांमुळे ऊस्थळ दुमाला सोसायटीचे पाऊल शेतकरीहिताच्या दिशेने ऐतिहासिक मानले जात आहे.





