वाकडी ग्रामपंचायतच्या विकास कामांसाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेबांकडे निवेदन
खडीकरण, डांबरीकरण व सौर एलईडी दिव्यासाठी ग्रामस्थांची मागणी
वाकडी
ग्रामपंचायतच्या विकास कामांसाठी खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे साहेबांकडे निवेदन
खडीकरण, डांबरीकरण व सौर एलईडी दिव्यासाठी ग्रामस्थांची मागणी

नेवासा (प्रतिनिधी) – मौजे वाकडी, तालुका नेवासा येथील विविध विकास कामांना मंजुरी मिळावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत वाकडी तर्फे खासदार साहेबांकडे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये वाकडी–खामगाव शिवरस्ता (अंदाजे दीड किलोमीटर) या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तसेच लक्ष्मी माता मंदिरासमोर सौर एलईडी दिवा बसविणे या दोन प्रमुख कामांचा समावेश आहे.
दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार ही मागणी करण्यात आली असून, त्याची प्रत सुद्धा निवेदनासोबत सादर करण्यात आली आहे.
या प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक रोहिदास काळे, नरेंद्र पाटील काळे, आप्पासाहेब काळे सर,ग्रामपंचायत सदस्य अनिल बनकर, संतोष कराळे, अविनाश काळे (वाकडी सोसायटी चेअरमन), तसेच मनोज कारले व युवा नेते कारले पाटील उपस्थित होते.
खासदार साहेबांनी या विषयावर तातडीने लक्ष देऊन “या मागणीचा पाठपुरावा करून लवकरच कामांना मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे आश्वासन दिले.

या वेळी नरेंद्र पाटील काळे यांनी खासदार साहेबांचा सन्मान करून आभार व्यक्त केले,यावेळी युवा नेते रोहित भाऊसाहेब वाकचौरे तर खासदारांचे जनसंपर्क अधिकारी सोनवणे साहेब देखील उपस्थित होते.
🌾 वाकडी ग्रामपंचायत व वाकडी धनगरवाडी शिवरस्त्याचे लाभधारक ग्रामस्थ यांच्यावतीने ही मागणी करण्यात आली आहे.

✍️ — नरेंद्र पाटील काळे, पत्रकार
खबरनामा न्यूज, नेवासा




