जामखेडमध्ये रासायनिक दूध निर्मितीचा भंडाफोड ; १७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
शेवगांव तालुक्यातील दूध भेसळीवर होणार का कारवाई ?


📰 हेडलाईन :
जामखेडमध्ये रासायनिक दूध निर्मितीचा भंडाफोड ; १७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
शेवगाव तालुक्यातील दूध भेसळीवर होणार का कारवाई ?
प्रतिनिधी | अविनाश देशमुख, शेवगांव
दिनांक : १६ फेब्रुवारी २०२६, सोमवार
जामखेड तालुक्यातील फक्राबाद परिसरात रासायनिक पदार्थांचा वापर करून बनावट दूध तयार करणाऱ्या केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १७ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात रासायनिक साहित्य, तयार दूध व उपकरणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,
समीर कमरुद्दीन शेख (वय ३०, रा. उंबरे ता. राहुरी)
आफताब कलीम शेख (वय २८, रा. राहुरी)
केंद्र चालक रामदास नवनाथ उबाळे (वय ४६, रा. फक्राबाद ता. जामखेड)
हे आरोपी पराफिन ऑईल, दूध पावडर आदी रासायनिक पदार्थांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करत होते. येथे अंदाजे २४ हजार लिटर बनावट दूध निर्मिती क्षमता असलेली यंत्रणा उभारण्यात आली होती. हे दूध बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
🧾 जप्त मुद्देमाल
कारवाईदरम्यान खालील साहित्य जप्त करण्यात आले :
१,१९८ लिटर पराफिन ऑईल
सुमारे ₹५८,००० किमतीची साखर
३०० किलो दूध पावडर
३२० लिटर तयार रासायनिक दूध (₹१२,९६०)
अंदाजे ₹१४ लाख किमतीची दोन पिकअप वाहने
एकूण जप्त मुद्देमाल : ₹१७,३२,४५८
⚖️ गुन्हा दाखल
तिघांविरुद्ध पुढील कलमान्वये गुन्हा दाखल :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २७४, २७५, २३२, ३(५)
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६
👮♂️ कारवाईतील अधिकारी
ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात :
पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी
उपनिरीक्षक समीर अभंग
हृदय घोडके
संतोष खैरे
दिपक घाटकर
गणेश लबडे
राहुल द्वारके
लक्ष्मण खोकले
फुरकान शेख
राहुल डोके
भाऊसाहेब काळे
तसेच इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

📌 प्रशासनाची भूमिका
जिल्ह्यात वाढत्या दूध भेसळीच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
🔴 ताजा कलम
शेवगांव शहरालगत तसेच धरण परिसरातील अनेक गावांमध्ये शेकडो लिटर बनावट दूध निर्मिती होत असल्याची चर्चा आहे. ज्यांच्या दारात अवघ्या दोन गायी व एक म्हैस आहे, तेच शासकीय व खासगी डेअरींना २०० ते ५०० लिटर दूध कसे पुरवतात ?
या “मापातील पाप” करणाऱ्या भामट्यांवर अन्नभेसळ विभाग व एल.सी.बी. कारवाई करणार का ? — असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
— अविनाश देशमुख, शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार




