Breaking
ई-पेपरकुकाना गटनेवासानेवासा नगरपरिषदनेवासा मतदार संघ आमदार विठ्ठलराव लंघे साहेबब्रेकिंगभेंडा गट जिल्हा परिषद निवडणूकमहिला सक्षमीकरणमाननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्यमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईविशेष निवडशिबिरशिवसेना

महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी उपक्रम

स्वामी फॅशन स्टुडिओ अंतर्गत कामगार शिलाई मशीन योजना यशस्वीपणे राबवली

0 6 0 6 2 8

🗞️ खबरनामा न्यूज | कुकाणा

महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी उपक्रम

स्वामी फॅशन स्टुडिओ अंतर्गत कामगार शिलाई मशीन योजना यशस्वीपणे राबवली

📍 कुकाणा :

महिला स्वावलंबन आणि सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, कुकाणा येथे स्वामी फॅशन स्टुडिओ अंतर्गत कामगार शिलाई मशीन योजना वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पत्नी सौ. रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या शुभहस्ते यशस्वीपणे संपन्न झाला.

या कार्यक्रमास श्री. भाऊसाहेब गोंधळे, पवार सर, सय्यद सर, रोडगे सर, श्री. किरण शिंदे यांच्यासह सौ. देशमुख ऐश्वर्या, सौ. पौर्णिमा चंदन, सौ. उषाताई पवार, सौ. रूपाली मॅडम, सौ. सुजाता मॅडम, सौ. राजश्री शिंदे तसेच परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा निर्धार

मार्गदर्शन करताना सौ. रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाल्या,

👉 “येणाऱ्या काळात संपूर्ण तालुक्यात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करून या योजनेचा लाभ प्रत्येक महिला भगिनीपर्यंत पोहोचवणार आहोत. महिलांनी स्वावलंबी व्हावे, स्वतःचा रोजगार उभा करावा, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

आयोजकांचे कौतुक

या उपक्रमाचे आयोजन अनुराधा वाळुंजकर व श्याम पाठक यांनी केले असून, त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.

महिलांच्या हाताला काम, घराला आधार आणि समाजाला सक्षम करणारा हा उपक्रम कुकाण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

खबरनामा न्यूज

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे