पिंपळगाव मध्ये शेतकरी संघटनेचे निवेदन – शेती पंपासाठी आठ तास थ्री फेज वीज पुरवठ्याची मागणी
पिंपळगाव शाखा अधिकाऱ्यांना निवेदन सादर, मागण्या मान्य – विनाअडथळा वीज न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

पिंपळगाव मध्ये शेतकरी संघटनेचे निवेदन – शेती पंपासाठी आठ तास थ्री फेज वीज पुरवठ्याची मागणी

पिंपळगाव शाखा अधिकाऱ्यांना निवेदन सादर, मागण्या मान्य – विनाअडथळा वीज न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
—
पिंपळगाव ( प्रतिनिधी) पिंपळगाव व परिसरातील शेतकऱ्यांना सतत तासन्तास थ्री फेज वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने आज शाखा अधिकारी तरटे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये पुढील काळात शेतीपंपांसाठी किमान आठ तास अखंडित वीजपुरवठा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देण्यात आला.
या वेळी तरटे साहेब यांनी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य करत आश्वासन दिले.
निवेदन प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये पिंपळगावचे माजी उपसरपंच राजेंद्र दिवेकर, पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील नातू, दौंड तालुका कार्याध्यक्ष महेश थोरात, राम गाडेकर, ब्रह्मानंद मापारे, राजेंद्र शिंदे, सचिन कापरे, दादा नातू, बापू शिंदे, नितीन जावळे, राहुल इनामके, प्रकाश कापरे, तुळशीराम दिवेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.