राज्यस्तरीय सन्मान सोहळा यशस्वीरीत्या संपन्न — श्री. शंकरराव कन्हेरेकर यांना ‘सामाजिक रत्न पुरस्कार’
पुणे – मातृभूमी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने २४ ऑगस्ट २०२५ रोजी नवी पेठ, पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या संपन्न झाला.

📅 दिनांक : २५ ऑगस्ट २०२५

या सोहळ्यात श्री. शंकरराव रामभाऊज कन्हेरेकर (वृद्धमित्र व सामाजिक कार्यकर्ता) यांना त्यांच्याच क्षेत्रातील दीर्घकालीन समाजसेवेबद्दल ‘राज्यस्तरीय सामाजिक रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वृद्धाश्रम, सामाजिक न्याय आणि निस्वार्थ कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
📍 स्थळ: निवारा हॉल, वृद्धाश्रम, एस. एम. जोशी फाउंडेशन समोर, पत्रकार भवन शेजारी, गाजेंद्र चौक, नवी पेठ, पुणे
🗓 रविवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५
🕛 दुपारी १२:०० वाजता
समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष श्री. अशोक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
या सन्मानामुळे श्री. कन्हेरेकर यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेली असून, त्यांच्या पुढील कार्याला नवे बळ मिळेल असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
अधिक माहितीसाठी संपर्क:
मातृभूमी सोशल फाउंडेशन
(आयोजक मंडळ)