नेवासा नगराध्यक्षपदासाठी डॉ. करण घुले यांची उमेदवारी दाखल
नेवासा नगराध्यक्षपदासाठी डॉ. करण घुले यांची उमेदवारी दाखल


खबरनामा न्यूज — खास रिपोर्ट
नेवासा नगराध्यक्षपदासाठी डॉ. करण घुले यांची उमेदवारी दाखल
विठ्ठलराव लंघे व उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा बदलाच्या दिशेने
नेवासा :
वैद्यकीय क्षेत्रात अग्रगण्य व विश्वासार्ह नाव, शहरातील प्रत्येक कुटुंबाशी अतूट नाते निर्माण करणारे, आणि शेकडो सामाजिक उपक्रम राबवणारे डॉ. करण घुले यांनी आज शिवसेना (शिंदे गट) तर्फे नेवासा नगराध्यक्ष पदासाठी आपले नामनिर्देशन दाखल केले. शहरात मोठे शक्तीप्रदर्शन होऊन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“आपल्या सर्वांच्या मतरूपी आशीर्वादाने नेवासा शहराचा सर्वांगीण व पारदर्शक विकास साध्य करण्यासाठी ठामपणे प्रयत्नशील राहीन,” असे त्यांनी सांगितले.
सेवा आणि जनसंपर्काची भक्कम पार्श्वभूमी
डॉ. घुले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून
• आरोग्य सेवा
• कामगार सेवा
• विद्यार्थी व गरजूंसाठी मदत
• नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे
• सामाजिक जनजागृती मोहिमा
या माध्यमातून नेवासात स्वतःचा प्रभावी व सकारात्मक ठसा उमटवला आहे.
फाउंडेशन व मार्फत त्यांनी शहरात शेकडो लोकांपर्यंत सेवा पोहोचवली असून, नागरिकांचे त्यांच्या कामावर अढळ विश्वास आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासनिधीची गंगा नेवासकरांच्या दारात
“आमदार विठ्ठलराव लंघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहरात विकासनिधीची गंगा आणण्याचे लक्ष्य आहे. नेवासाचा विकास हीच आमची तळमळ आहे,” असे डॉ. घुले यांनी सांगितले.
⬇️ विशेष उल्लेख ⬇️
🟧 विशेष उल्लेख 🟧
“माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहरात विकासाचा भरारी कार्यक्रम राबवला जाईल.
संधी मिळाली तर संधीचं सोनं केलं जाईल… एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो.”
— डॉ. करण घुले
नेवासा शहरासाठी डॉ. घुले यांची ७ सूत्रांची विकासदृष्टी
✔ पिण्याच्या पाण्याचे शाश्वत व वैज्ञानिक व्यवस्थापन
✔ घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरणपूरक विघटन प्रक्रिया
✔ प्रवरा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी STP योजना
✔ अतिक्रमणमुक्त शहर व व्यापाऱ्यांचे सुसज्ज पुनर्वसन
✔ तीर्थक्षेत्र विकासातून आर्थिक उभारणी
✔ आरोग्य व शिक्षण व्यवस्थेत लोकाभिमुख सुधारणा
✔ सरकारी जागेवरील रहिवाशांचे अतिक्रमण नियमन व घरकुलाचा लाभ
खबरनामा न्यूजसाठी खास — प्रबळ दावेदाराची दमदार एंट्री
नेवासातील वैद्यकीय सेवा, सामाजिक बांधिलकी, स्वच्छ प्रतिमा, नागरिकांचा दांडगा विश्वास व वरिष्ठ नेतृत्वाचे मार्गदर्शन या सर्वांच्या जोरावर
डॉ. करण घुले हे या निवडणुकीतील सर्वात प्रबळ आणि चर्चेतले दावेदार ठरले आहेत.
खबरनामा न्यूज
विशेष प्रतिनिधी — नरेंद्र पाटील काळे




