शेतकरी कर्जमुक्तीसाठी शासनाला जाग येण्यासाठी श्रीविठ्ठल मंदिरात सायंकाळी “घंटानाद आंदोलन”!
राज्यभर शेतकरी कर्जमुक्तीसाठी आंदोलनाचा धग वाढत असून, सातबारा कोरा व्हावा ही शेतकऱ्यांची रास्त मागणी आता जनआंदोलनाच्या रूपात पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला, शनिवार दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता, टाकळीभान येथील यादव कालीन श्रीविठ्ठल मंदिरात एक आगळंवेगळं आणि साद घालणारं घंटानाद आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

शेतकरी कर्जमुक्तीसाठी शासनाला जाग येण्यासाठी श्रीविठ्ठल मंदिरात सायंकाळी “घंटानाद आंदोलन”!
टाकळीभान (प्रतिनिधी):
राज्यभर शेतकरी कर्जमुक्तीसाठी आंदोलनाचा धग वाढत असून, सातबारा कोरा व्हावा ही शेतकऱ्यांची रास्त मागणी आता जनआंदोलनाच्या रूपात पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला, शनिवार दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता, टाकळीभान येथील यादव कालीन श्रीविठ्ठल मंदिरात एक आगळंवेगळं आणि साद घालणारं घंटानाद आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलना मागील उद्देश शासनाला जाग आणण्याचा असून, पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा व्हावी व त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशी ठाम मागणी यामागे आहे.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनील औताडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की,
“शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आणि उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली 19 मार्च रोजी पुण्यातून शेतकरी कर्जमुक्ती अभियान सुरू झाले. त्याला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तरीही शासन झोपेचे सोंग घेत आहे. आता वेळ आली आहे की शासनाने आषाढी एकादशीचे औचित्य साधून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रत्यक्ष घोषणा करून ती अंमलात आणावी.”
तालुकाध्यक्ष युवराज जगताप म्हणाले की,
“शासनाचा शेतकऱ्यांबद्दल नेहमीच उपेक्षेचा दृष्टिकोन राहिला आहे. शेती तोट्यात गेली असून, दुग्ध व्यवसायही अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या लढ्याला शासनाने गांभीर्याने घ्यावे म्हणून हे घंटानाद आंदोलन आयोजित केले आहे.”
या आंदोलनात पुढील शेतकरी नेते व कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत:
अनील औताडे, रुपेश काळे, हरिअप्पा तुवर, राजेंद्र लांडगे, युवराज जगताप, मेजर अशोक काळे, शरद आसने, डॉ. रोहित कुलकर्णी, राजेंद्र कोकणे, नरेंद्र काळे, डॉ. दादासाहेब आदिक, डॉ. नितीन आसने, ॲड. सर्जेराव घोडे, ॲड. प्रशांत कापसे, डॉ. विकास नवले, संतोष पटारे, सुजित बोडखे, ईश्वर दरंदले, सागर गिऱ्हे, सचिन वेताळ, संदीप उघडे, सुरेश काळे, अशोक काळे, शिवाजी पटारे आदी शेतकरी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
शेतकऱ्यांच्या या ऐतिहासिक आणि श्रद्धास्थळी होणाऱ्या घंटानाद आंदोलनात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्कासाठी:
शेतकरी संघटना, अहमदनगर जिल्हा
प्रवक्ते: अनील औताडे
📞 [संपर्क क्रमांक 99705 75686]