कडुबाळ रायभाण फटागंडे यांच्या जमिनीबाबत चौकशीचा मागोवा घ्या – 15/11/2019 च्या मार्गदर्शन अहवालाची प्रत मागणी
कडुबाळ रायभाण फटागंडे यांच्या जमिनीच्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी त्यांनी पुन्हा एकदा शासन दरबारी आवाज उठवला आहे. यासंदर्भात त्यांनी मा. ना. मकरंद आबा पाटील साहेब, विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

कडुबाळ रायभाण फटागंडे यांच्या जमिनीबाबत चौकशीचा मागोवा घ्या – 15/11/2019 च्या मार्गदर्शन अहवालाची प्रत मागणी

मुंबई नेवासा प्रतिनिधी | खबरनामा न्यूज
कडुबाळ रायभाण फटागंडे यांच्या जमिनीच्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी त्यांनी पुन्हा एकदा शासन दरबारी आवाज उठवला आहे. यासंदर्भात त्यांनी मा. ना. मकरंद आबा पाटील साहेब, विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की, 15/11/2019 रोजी शासनाने त्यांच्या प्रकरणावर मार्गदर्शन अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, आणि अहवालाची प्रतही संबंधितांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे फटागंडे यांनी या अहवालाची प्रत त्वरीत उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
फटागंडे यांनी यापूर्वीही आपली व्यथा शासन दरबारी वेळोवेळी मांडली आहे. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटप संदर्भातील अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी अनेक वेळा निवेदने दिली असून, प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले आहे. याप्रकरणी महसूल व भूमापन कार्यालयामार्फत झालेल्या चौकशीची माहिती व अहवाल लपविण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
फटागंडे यांनी या निवेदनात इशारा दिला आहे की, जर दिनांक 14 जुलै 2025 पर्यंत संबंधित अहवाल देण्यात आला नाही, तर ते मंत्रालयाच्या परिसरात आत्मदहन करतील.