सेवाभावी अधिकारी आणि यशस्वी गुणवंतांचा वाकडी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान
वाकडी गावामध्ये एक प्रेरणादायी व सन्मानपूर्वक कार्यक्रम पार पडला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवानिवृत्त शाखाधिकारी श्री. पांडुरंग चंद्रहास गायकवाड यांच्या गौरवशाली सेवापुर्ती निमित्ताने गावकऱ्यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

📍 स्थळ: ह.भ.प. हनुमान मंदिर पटांगण, वाकडी (ता. नेवासा)
🗓️ दि. १३.०७.२०२५
सेवाभावी अधिकारी आणि यशस्वी गुणवंतांचा वाकडी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान
नेवासा प्रतिनिधी :
वाकडी गावामध्ये एक प्रेरणादायी व सन्मानपूर्वक कार्यक्रम पार पडला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवानिवृत्त शाखाधिकारी श्री. पांडुरंग चंद्रहास गायकवाड यांच्या गौरवशाली सेवापुर्ती निमित्ताने गावकऱ्यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात गावातील विविध पदांवर निवड झालेल्या गुणवंत युवकांचाही सन्मान करण्यात आला. स्पर्धा परीक्षा यशस्वी होऊन सरकारी सेवेत रुजू झालेल्या नवनिर्वाचित अधिकाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त शेती अधिकारी गोरक्षनाथ काळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. अंकुश काळे, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी संचालक आदरणीय सुखदेव काळे गुरुजी, जालिंदर काळे (से.नि. शाखाधिकारी), तसेच ग्रामपंचायत व विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुखदेव काळे गुरुजी यांनी आपल्या मनोगतातून गावातील यशस्वी तरुणांचे कौतुक करताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी गावासाठी भरीव योगदान देणाऱ्या तरुणांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असेही आवर्जून सांगितले.

श्री. अंकुश काळे यांनी आपल्या भाषणात असे स्पष्ट केले की, गावातील कोणीही व्यक्ती तालुक्यापातळीवर पुढे जात असेल, तर गावाचे कर्तव्य आहे की त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. अशा सहकार्यानेच गावाचा सर्वांगीण विकास शक्य आहे.
या कार्यक्रमात नरेंद्र पाटील काळे यांनी एक सामाजिक उपक्रम म्हणून गावपातळीवरील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका स्थापन करण्याची संकल्पना मांडली. या केंद्राच्या माध्यमातून यशस्वी उमेदवारांनी इतर तरुणांना मार्गदर्शन करावे आणि गावातील युवकांना व्यसनमुक्त ठेवून शिक्षणाची वाट दाखवावी, असे त्यांनी आपल्या भाषणात आवाहन केले. ग्रामपंचायत आणि सामाजिक संस्थांनी या उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
—
सन्मानित गुणवंतांची यादी:
भीमराज पाटील काळे यांच्या कन्या – शासकीय सेवेत यशस्वी निवड
श्री. गोरे यांचे चिरंजीव – पोलीस भरती परीक्षेत यश
भाऊसाहेब बनसोडे (वाकडी सोसायटी चेअरमन) यांचे चिरंजीव – स्पर्धा परीक्षेत यश
अजय माणिक काळे, अविनाश काळे, संतोष कराळे, रमेश भगवान काळे, अशोक काळे ( माजी चेअरमन) नानासाहेब जाधव, संभाजी रामदास काळे माजी सरपंच, तसेच गो शाळेची कमिटी व अशोक जाधव (टेलर), भजनी मंडळाचे रामनाथ कारले, किसनगिरी भक्त मंडळ, विकास काळे, आप्पासाहेब काळे सर, संजय पंढरीनाथ गवारे, गणेश निकम, अनिल भगत उर्फ काळे पाटील बाळासाहेब मगन काळे, बाळासाहेब गवारे, देविदास काळे साहेब पाटबंधारे निवृत्त अधिकारी प्रकाश दादा काळे, संजय काळे सर, मुकेश जाधव , संदीप जवदे ,तुकाराम ऊर्फ बंडू काळे (जगदंबा पाणी वापर संस्था) न्यायमद शेख भाई, गोरख पेटे — यांचा विशेष सन्मान

कार्यक्रमाचे सुरेख आणि प्रभावी सूत्रसंचालन श्री. सुरेश अर्जुन काळे सर यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप श्री. महेश जाधव यांनी केला
—
सहभागी संस्था व मान्यवर
वाकडी सोसायटी सचिव – श्री. हिवरे
ग्रामपंचायत पदाधिकारी – सरपंच भाऊसाहेब भडके, राजू कार्ले, मनोज कार्ले व मित्रमंडळ
या कार्यक्रमाद्वारे एकतेचा, प्रोत्साहनाचा आणि ग्रामविकासाच्या दिशेने चाललेल्या सामूहिक प्रयत्नांचा एक आदर्श घालून देण्यात आला.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहार देण्यात आला.

📸 [छायाचित्रे)
✍️ प्रस्तुती : नरेंद्र पाटील काळे,
Khabarnama News Network




