🚨 ब्रेकिंग न्यूज | शेवगाव 🚨 भूमी अभिलेख कार्यालयात 20 हजारांची लाच घेताना खासगी इसम रंगेहात अटकेत
उपअधिक्षकावर लाचेची मागणी केल्याचा गंभीर आरोप

🚨 ब्रेकिंग न्यूज | शेवगाव 🚨
भूमी अभिलेख कार्यालयात 20 हजारांची लाच घेताना खासगी इसम रंगेहात अटकेत
उपअधिक्षकावर लाचेची मागणी केल्याचा गंभीर आरोप
अहिल्यानगर | प्रतिनिधी – खबरनामा न्यूज
अहिल्यानगर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत शेवगाव भूमी अभिलेख (सिटी सर्वे) कार्यालयातील उपअधिक्षकाच्या वतीने लाच स्वीकारणाऱ्या खासगी इसमाला 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई 19 जानेवारी 2026 रोजी शेवगाव तालुक्यात करण्यात आली.
तक्रारदाराच्या नावे असलेल्या शेवगाव येथील सिटी सर्व्हे नंबर 489 मधील जमिनीच्या नोंद प्रक्रियेसाठी
किरण अशोक कांगणे
(वय 52, पद – उपअधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, शेवगाव)
यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार ही लाच देवेंद्र त्रिंबक फुंदे
(वय 40, व्यवसाय – खासगी इसम, रा. शेवगाव)
याच्या माध्यमातून स्वीकारण्याचे ठरवण्यात आले होते.
🔍 ACB ची सापळा कारवाई
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार दाखल केल्यानंतर ACB पथकाने पडताळणी केली. पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर 19 जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला.
कारवाईदरम्यान देवेंद्र त्रिंबक फुंदे याने तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात अटक करण्यात आली.
⚖️ गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन येथे
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत
कलम 7 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
👮♂️ कारवाईत सहभागी अधिकारी
या यशस्वी कारवाईत
पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे
पोलीस हवालदार संदीप हांडगे
पोलीस शिपाई सुरेश चव्हाण
यांचा समावेश होता.
📞 नागरिकांसाठी आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की,
कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास तत्काळ ACB शी संपर्क साधावा.
➡️ टोल फ्री क्रमांक : 1064
➡️ मोबाईल : 9168641064
🔥 ताजं कलम | संपादकीय टिप्पणी 🔥
“राम नाम जपणा आणि पराया माल आपणा” या वृत्तीने शेवगाव तालुक्यातील अनेक सरकारी कार्यालये पोखरली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये उघडपणे सुरू आहे.
महसूल खाते, तहसील कार्यालय, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महावितरण (शहर व ग्रामीण), पंचायत समिती, पाटबंधारे विभाग, वन विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच इतर निमशासकीय कार्यालयांमध्येही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत गंभीर तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
❓ या भ्रष्ट साखळीच्या मुसक्या आवळणार तरी कोण?
❓ ACB ची कारवाई ही सुरुवात ठरेल का?
✍️ अविनाश देशमुख, शेवगाव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
📞 9960051755 | 9270442511
📰 खबरनामा न्यूज – सत्य, तथ्य आणि जनहितासाठी कटिबद्ध




