Breaking
आमदार चंद्रशेखर पाटील घुलेआमदार डाँ. नरेंद्र पाटील घुलेआमदार मोनिकाताई राजळे पाथर्डीआमदार विठ्ठलराव लंघे नेवासाई-पेपरउपमुख्यमंत्री मा .एकनाथजी शिंदे साहेबनिवडणूक वार्ताविशेष निवडशेवगावशेवगाव नगरपंचायतशेवगाव नगरपरिषदसंजीव भोर शिवसेना प्रवक्ता

शेवगावची नवीन राजकीय अरुणोदय संस्कृती

*शेवगांव नगरपरिषद निवडणुकीत धनुष्यबाणाने केल्या कमळाच्या पाकळ्या गायब आन घडयाळाचे काटे फिरवले उलटे आणि तुतारीच्या माणसाला केले गायब*

0 6 0 6 2 1

शेवगावची नवीन राजकीय अरुणोदय संस्कृती

नगरपरिषद निवडणुकीत सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श

✍️ विशेष प्रतिनिधी | शेवगाव,अविनाश देशमुख

अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखानदारांचे वलय लाभलेला, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा केंद्रबिंदू असलेला शेवगाव तालुका—येथील नगरपरिषद निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण, हा तालुका केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर राजकीय वारशाने समृद्ध आहे.

पद्मभूषण स्व. बाळासाहेब भारदे, स्व. वकीलराव लंघे पाटील, स्व. आबासाहेब काकडे, संभाजीराव फाटके पाटील, स्व. मारुतराव घुले पाटील, स्व. बबनराव ढाकणे, स्व. बाबुराव आव्हाड, स्व. बाळासाहेब विखे पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांनी या तालुक्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे शेवगावकडे नेहमीच राजकीय संवेदनशीलतेने पाहिले जाते.

चार पक्ष – चार उमेदवार, थेट लढत

या निवडणुकीत राज्यातील महायुती किंवा महाविकास आघाडीचे समीकरण बाजूला ठेवत, चारही प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे समोरासमोर लढले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) – विद्याताई अरुणराव लांडे पाटील

शिवसेना – सौ. मायाताई अरुण मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) – परवीनभाभी एजाजमामा काझी

भाजपा – रत्नमालाताई फलके

निवडणूक पहिल्यापासूनच अटीतटीची होणार हे स्पष्ट होते.

राजकीय गणितं बदलली… आणि इतिहास घडला

शहरात पहिल्यांदाच मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर मा. जिल्हा परिषद सदस्या हषदाताई काकडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलली. शेवगावकरांमध्ये नव्या बदलाबाबत उत्सुकता निर्माण झाली—आणि त्याच उत्सुकतेला मतपेटीतून उत्तर मिळाले.

शिवसेना उमेदवार सौ. मायाताई मुंडे नगराध्यक्षा पदावर निवडून आल्या, आणि अनेक वर्षांनंतर शिवसेनेला शेवगावकरांनी सत्तेची संधी दिली.

निवडणूक संपली… संस्कृती जिंकली

या संपूर्ण निवडणुकीचे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे—

👉 खेळीमेळीचे वातावरण

👉 वैयक्तिक टीका-टिप्पणीला फाटा

👉 राजकीय परिपक्वता

निवडणुकीतील संघर्ष अपेक्षित असतो, पण शेवगावमध्ये तो सभ्यतेच्या चौकटीत राहिला. जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण करणारी ही निवडणूक ठरली.

विरोधात असूनही आदर्श राजकारण

निवडणुकीनंतर विरोधात असलेल्या, प्रचंड अनुभव असलेल्या अरुणराव लांडे पाटील यांच्यासह इतर उमेदवारांनी निवडून आलेल्या नगराध्यक्षा सौ. मायाताई मुंडे यांचा सहकुटुंब सत्कार केला—आणि एक मोठा संदेश दिला.

राजकारणात मतभेद असू शकतात, पण मनभेद नकोत!

हा प्रसंग सिद्ध करतो की—

शेवगावचे राजकारण सुसंस्कृत, सभ्य आणि प्रेरणादायी आहे.

हीच खरी अरुणोदय संस्कृती असून ती पुढील पिढीसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झालेल्या मतदारांनाही सलाम

निवडून आलेल्या नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांचे अभिनंदन तर आहेच; पण मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक मतदाराचेही अभिनंदन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

अपेक्षा एकच… शेवगावचा सर्वांगीण विकास

नवीन पदाधिकारी शेवगावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करतील, हीच अपेक्षा.

(क्रमशः)

✍️ शब्दांकन

ॲड. संदिप रामनाथ आंधळे

हायकोर्ट खंडपीठ औरंगाबाद

छत्रपती संभाजीनगर

खबरनामा न्यूज

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे