Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषीवार्तागुन्हेगारीगौण खनिज बेकायदेशीर उत्खननजिल्हाधिकारीतहसीलदार नेवासानेवासा तालुकापंचनामापालकमंत्री राधाकृष्ण विखेपुनर्वसन विभाग मंत्रालयपोलीस स्टेशनपोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंग

प्रशासकीय ‘झोप’ उडवण्यासाठी तहसीलदारांना ‘अलार्म घड्याळ’ भेट

नेवाशात तक्रारदाराचे गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन

0 6 0 6 2 6

प्रशासकीय ‘झोप’ उडवण्यासाठी तहसीलदारांना ‘अलार्म घड्याळ’ भेट

नेवाशात तक्रारदाराचे गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन

नेवासा | प्रतिनिधी

नेवासा तहसील कार्यालयात अवैध गौण खनिज उत्खननासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीला तब्बल दोन महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात एका सजग नागरिकाने गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन छेडले आहे.

तक्रारदार सुहास बाळासाहेब वेताळ यांनी नूतन वर्षाचे औचित्य साधत तहसीलदार कार्यालयाला थेटअलार्म घड्याळ’, ‘कालनिर्णय’ (दिनदर्शिका) आणि ‘डायरी’ सप्रेम भेट देत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात निषेध नोंदवला.

दोन महिन्यांपूर्वी तक्रार, पण कारवाई शून्य

नेवासा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाबाबत सुहास वेताळ यांनी पुराव्यासह लेखी तक्रार तहसील कार्यालयाकडे दाखल केली होती. नियमांनुसार तातडीची कारवाई अपेक्षित असताना, महसूल विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही हालचाल न झाल्याने अखेर त्यांनी प्रशासनाला ‘जागे’ करण्याचा प्रतीकात्मक मार्ग अवलंबला.

प्रशासनाला दिलेल्या भेटीमागचा संदेश

अलार्म घड्याळ : प्रशासनाची सुस्त झालेली ‘झोप’ उडावी व कामकाज वेळेत व्हावे यासाठी.

कालनिर्णय (दिनदर्शिका) : तक्रार दिल्यापासून किती दिवस, किती महिने उलटले याचे भान राहावे यासाठी.

डायरी : प्रलंबित प्रकरणांची नोंद ठेवून त्यावर वेळेत कार्यवाही व्हावी यासाठी.

तक्रारदाराची थेट प्रतिक्रिया

> “मी दोन महिन्यांपासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारतो आहे. पण प्रशासन ढिम्म आहे. कदाचित वेळेचे भान राहिले नसेल किंवा अधिकारी झोपलेले असावेत, म्हणून हे साहित्य भेट दिले. नवीन वर्षात तरी प्रशासन जागे होईल आणि अवैध गौण खनिजावर कारवाई होईल, ही अपेक्षा आहे.”

सुहास बाळासाहेब वेताळ (तक्रारदार)

तालुक्यात चर्चेचा विषय

या अनोख्या आंदोलनामुळे संपूर्ण नेवासा तालुक्यात चर्चा रंगली आहे. सप्रेम भेटीमुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी चांगलेच अडचणीत आले असून,

आता प्रत्यक्ष कारवाई होणार की ही भेट केवळ शोभेपुरती ठरणार?

याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

 

2.2/5 - (4 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे