नेवासा नगरपंचायतला निधीची कमतरता पडू देणार नाही*
नगराध्यक्ष डॉ. करण घुले यांना विजयी करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जाहीर आव्हान*


*नेवासा नगरपंचायतला निधीची कमतरता पडू देणार नाही*
*नगराध्यक्ष डॉ. करण घुले यांना विजयी करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जाहीर आव्हान*

*नेवासा | प्रतिनिधी*
नेवासा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या सांगता सभेत *महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे* यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना–भाजपा युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
*यावेळी बोलताना* *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *म्हणाले की,* *“नगरविकास खाते माझ्याकडे आहे. त्यामुळे नेवासा नगरपंचायतीला कोणत्याही प्रकारची निधीची कमतरता पडू देणार नाही. तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार डॉक्टर आहे. मी डॉक्टर नसलो तरी अनेक भले-भले ऑपरेशन केले आहेत.”*
ते पुढे म्हणाले, *“नेवासा तालुक्यातील दहशत मोडली आहे. आता नेवासा शहर दहशतमुक्त करा.* मी नेवासा शहराचा सर्वांगिण विकास करून दाखवतो. मी एकदा शब्द दिला की तो पाळणारा कार्यकर्ता आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मी कार्यकर्ता आहे.”
नगराध्यक्ष पदासह *शिवसेना–भाजपा युतीच्या* सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान देत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, *“तुम्ही सर्व उमेदवार विजयी करा, तुम्हाला हवा तेवढा निधी देण्याची जबाबदारी माझी.”*
*या सांगता सभेचे* *सूत्रसंचालन पत्रकार सुधीर भाऊ चव्हाण* यांनी केले, तर *प्रास्ताविक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. करण घुले यांनी केले* .

यावेळी *आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी शहरातील विविध समस्यांवर सविस्तर प्रकाश टाकत मागील उमेदवार व माजी मंत्र्यांवर टीका केली.* त्यांनी मागील काळात शहरात जिरवा-जिर्वीचे राजकारण झाल्याचा आरोप करत *पुढील मागण्या मांडल्या—*
व्यापाऱ्यांसाठी तीन मजली भव्य-दिव्य व्यापारी कॉम्प्लेक्स
पाणीपुरवठ्यासाठी आणखी वाढीव निधी
शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरिकांना उतारे देऊन घरकुल योजना
*शिवसेना–भाजपा युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान त्यांनी लाडक्या बहिणी व लाडक्या भावांना केले.*

लाडक्या बहिणींच्या प्रतिनिधी सौ आमदार रत्नमाला लंघेयांनी मुख्यमंत्र्यांना ग्रंथ भेट देऊन सत्कार केला न्यायावासाच्या महिलांच्या वतीने
🔸 *व्यासपीठावर उपस्थित मान्यवर*
या वेळी व्यासपीठावर
*शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबुशेठ टायरवाले,*
*शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पवार,*
*नेवासा शहर अध्यक्ष मनोज पारखे,*
*आमदार पत्नी रत्नमालाताई लंघे,*
*शिवसेना* *संपर्क प्रमुख भाऊसाहेब मामा वाघ,*
*भारतीय जनता पार्टीचे सतीश गायके,*
*सोशल मीडिया प्रमुख आदिनाथ पटारे,*
*नेवासा शहर अध्यक्ष बंडू शिंदे,*
पंकज जेधे, नितीन मिरपगार, सुशील धायजे
यांच्यासह *शिवसेना–भाजपा युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

✍️ *खबरनामा न्यूज*




