वाकडी पाणी वापर संस्थेचे संचालक रोहिदास काळे यांच्या वैयक्तिक पुढाकारातून अतिवृष्टी बाधित कुटुंबांना किराणा वाटप
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मानवीय मदतीचा उपक्रम

वाकडी पाणी वापर संस्थेचे संचालक रोहिदास काळे यांच्या वैयक्तिक पुढाकारातून अतिवृष्टी बाधित कुटुंबांना किराणा वाटप
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मानवीय मदतीचा उपक्रम
वाकडी (प्रतिनिधी) : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाकडी पाणी वापर संस्थेचे संचालक रोहिदास काळे यांच्या वैयक्तिक पुढाकारातून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना किराणा भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. या उपक्रमास चेअरमन बंडू उर्फ तुकाराम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे गावातील अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने राहण्या पासून थेट झोपण्यापर्यंत अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. अजूनही काही घरात पाणी असल्याने चूल-मूल सुरळीत ठेवणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर छोट्या स्वरूपात प्रत्येक बाधित कुटुंबाला किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी भाऊसाहेब पाटील भगत उर्फ काळे, श्री गोरक्ष काळे(माजी शेतकरी अधिकारी), सुखदेव काळे गुरुजी, रमेश भगवान काळे, अजय माणिक काळे, किसन वडागळे, आर. आर. आबा काळे, वाकडी सोसायटीचे चेअरमन अविनाश काळे, किसनगिरी बाबा मंडळ, राज योद्धा ग्रुप, आमदार विठ्ठलराव लंघे मित्र मंडळ यांच्यासह संतोष कराळे, दादासाहेब काळे गोरक्षक, सुभाष काळे, अनिल भगत, बाळासाहेब काळे, आत्माराम वडागळे, विठ्ठल त्रिंबक काळे, युवा नेते नजन काळे, टेलर काळे, सुरेश वाघ, बाळू बनकर, किशोर लष्करे, बापू काळे, किसान चुनखडे, बापूतात्या गोविंद काळे, उत्तम कारले (संचालक, वाकडी सोसायटी) आदी मान्यवर उपस्थित होते.
👇👇👇👇👇
👆👆वरील लाल बटन ला क्लिक करून बातमी सविस्तर पहा👆
खबरनामा न्यूज प्रतिनिधीने या उपक्रमाबाबत विचारले असता वाकडी पाणी वापर संस्थेचे संचालक रोहिदास काळे म्हणाले, “ज्या वेळी आपल्या कुटुंबातील ग्रामस्थ संकटात असतात, त्यावेळी प्रथम नागरिक म्हणून मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता गाव पाचोर प्रत्येकाने अशा प्रकारे मदतीस पुढे यावे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रोहिदास काळे यांच्या वैयक्तिक पुढाकाराचे मनापासून कौतुक केले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.





