Breaking
जिल्हा परिषद अहिल्यानगरजिल्हा परिषद शाळा उपक्रमजिल्हाधिकारीज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानातहसीलदार नेवासानेवासाब्रेकिंगभानसहिवरा गटमहाराष्ट्रमुळा सहकारी साखर कारखानाविशेष निवडशिक्षण विभाग पुणेसहकारी साखर कारखानासाखर आयुक्त अहमदनगरसाखर आयुक्त पुणे

🧒 शाळाबाह्य विद्यार्थ्यांना ऊसतोडणीसोबत शिक्षणाचीही गोडी!

“गोड ऊस”सोबत “गोड शिक्षण” — भानसहिवऱ्यात शिक्षणाची नवी जागृती

0 6 0 6 2 6

🧒 शाळाबाह्य विद्यार्थ्यांना ऊसतोडणीसोबत शिक्षणाचीही गोडी!

 

“गोड ऊस”सोबत “गोड शिक्षण” — भानसहिवऱ्यात शिक्षणाची नवी जागृती

 

भानसहिवरा (वार्ताहर):

नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भानसहिवरा येथील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने एक प्रशंसनीय उपक्रम राबविला आहे. ऊसतोडणीसाठी आलेल्या मजूर कुटुंबांचा सर्वे करून त्यांच्या कुटुंबातील शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात पुन्हा दाखल करण्यात आले.

 

या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष ढवाण आणि त्यांचे सहकारी यांनी मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी भानसहिवरा केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र कडूपाटील यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सार्वमतचे पत्रकार अशोक पेहरकर यांनी भूषविले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना रवींद्र कडूपाटील म्हणाले,

 

> “परिस्थिती अभावी ऊसतोड मजूर पालकांसोबत लहान मुलांनाही थंडी, ऊन, वारा, पाऊस अशा कठीण परिस्थितीत गावोगावी फिरावे लागते. पण या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.”

 

शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. कडूपाटील यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

 

या उपक्रमासाठी मुख्याध्यापक राजेंद्र पाचे, श्रीधर साळुंके, श्रीमती आशा गवळी, श्रीमती सुमन सोळसे, महेश देवतरसे, दत्तात्रय चोथे, चंद्रकांत कदम, आणि वर्षाताई कुऱ्हाडे यांचे सहकार्य लाभले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय चोथे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राजेंद्र पाचे यांनी मानले.

📸 बातमी सादरकर्ते: खबरनामा न्यूज टीम, भानसहिवरा वार्ताहर

🗞️ संपादक: नरेंद्र पाटील काळे

 

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे