Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकृषी उत्पन्न बाजार समितीकृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईकृषीवार्ताकेळी उत्पादक संघटनाजिल्हाधिकारीनेवासानेवासा तालुकापंचनामापोलीस स्टेशनब्रेकिंगमहाराष्ट्रमहाराष्ट्र शासन कर्ज माफीमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईविमा कंपनीशेतकरी आंदोलनशेतकरी विरोधी कायदेसंभाजीनगरसांगलीसोलापूरस्वातंत्र्य दिनहमीभावहुकूमशाही

केळी उत्पादक शेतकऱ्यांची लूट – चार-पाच रुपयांवर विक्री, लाखोंचा खर्च भरूनही हातात काही नाही!

महाराष्ट्रातील केळी बागायतदार शेतकऱ्यांची आज अवस्था बिकट झालेली आहे. एकरी १ लाख ते सव्वा लाख रुपये खर्च करून उभारलेली केळी बाग शेवटी फक्त ४ ते ५ रुपये प्रतिकिलो या दराने विकावी लागत आहे. व्यापारी व एजंट मंडळी शेतकऱ्यांना विविध कारणे दाखवून कमी भावात खरेदी करतात, परिणामी शेतकऱ्यांची अक्षरशः लूट सुरू आहे.

0 6 0 6 1 8

केळी उत्पादक शेतकऱ्यांची लूट – चार-पाच रुपयांवर विक्री, लाखोंचा खर्च भरूनही हातात काही नाही!

औरंगाबाद / नाशिक / जळगाव प्रतिनिधी

महाराष्ट्रातील केळी बागायतदार शेतकऱ्यांची आज अवस्था बिकट झालेली आहे. एकरी १ लाख ते सव्वा लाख रुपये खर्च करून उभारलेली केळी बाग शेवटी फक्त ४ ते ५ रुपये प्रतिकिलो या दराने विकावी लागत आहे. व्यापारी व एजंट मंडळी शेतकऱ्यांना विविध कारणे दाखवून कमी भावात खरेदी करतात, परिणामी शेतकऱ्यांची अक्षरशः लूट सुरू आहे.

व्यापारी-एजंटांचा अजब कारभार

बुर्‍हानपूर उपज मंडी समितीचे दर दाखवून व्यापारी एजंट शेतकऱ्यांना सांगतात की बोर्डातच भाव कमी आहेत. प्रत्यक्षात मंडी दरापेक्षा २-४ रुपये कमी दरात केळी खरेदी केली जाते. एवढेच नव्हे तर, “लाली आली, तांब आली, चिलींग आले, स्पॉट पडले, वाढा कमी आहे” अशा सबबी सांगून भाव खाली आणले जातात.

मुख्य केळी पट्ट्यात शेतकरी हवालदिल

रावेर, जळगाव, भुसावळ, सावदा, चोपडा, धुळे, नंदुरबार, नांदेड, संभाजीनगर, नेवासा, अहमदनगर, दहेगाव, भेंडा, कुकाना आदी भागात आज केळी शेतकरी हातबल झाले आहेत. व्यापाऱ्यांच्या ठरलेल्या संगनमतामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाचा न्याय्य दर मिळत नाही.

संघटित होण्याची गरज

मराठवाडा विभागाध्यक्ष गुलाबभाई पठाण यांनी सांगितले की, “रावेर, जळगाव भागात केळी शेतकरी संघटित असल्याने दर २७ रुपयांपर्यंत मिळतो. पण इतरत्र शेतकऱ्यांना ४-५ रुपयांवर केळी विकावी लागते. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. शेतकरी बागायतदारांनी एकत्र येऊन व्यापाऱ्यां विरोधात ठोस भूमिका घेणे अत्यावश्यक आहे.”

सरकारकडे मागणी

शेतकरी संघटनेने राज्याचे कृषिमंत्री यांच्याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी मोठ्या संकटात सापडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे