खुला कांदा खरेदीचा नेवासा बाजार समितीचा शेतकरी हिताचा निर्णय* .*मा मंत्री शंकरराव गडाख पाटील
पहिल्याच दिवशी नेवासा कांदा मार्केटमध्ये विक्रमी 315 कांदा वाहनांची आवक*


खुला कांदा खरेदीचा नेवासा बाजार समितीचा शेतकरी हिताचा निर्णय* .*मा मंत्री शंकरराव गडाख पाटील
*पहिल्याच दिवशी नेवासा कांदा मार्केटमध्ये विक्रमी 315 कांदा वाहनांची आवक*
नेवासा प्रतिनिधी.
नेवासा बाजार समितीच्या खुला कांदा बाजार विक्रीचा शुभारंभ बुध दि 6 मे रोजी महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रम नेवासा बु,सुरेगाव गंगा,

वेदांतचार्य ह भ प
देवीदास महाराज म्हस्के श्री ज्ञानेश्वर संस्थान नेवासा,माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी केले
बाजार समितीचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहरात खुला कांदा मार्केट सुरू करण्यात आले असून याचा फायदा नेवासा शहर व परिसराच्या
अर्थकारणाला होणार आहे असे ते म्हणाले
याप्रसंगी बोलतांना महंत देविदास महाराज म्हस्के म्हणाले सर्वत्र
शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक पाऊल माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने नेवासा बाजार समितीने टाकले आहे हे प्रेरणादायी आहे
कांद्याचा बाजार हाकेच्या अंतरावर उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यक्रमाला आवर्जून बोलावले याचा मनस्वी आनंद असल्याचे ह भ प देविदास महाराज म्हस्के म्हणाले.
याप्रसंगी बोलतांना
महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर म्हणाले नेवासा शहरात खुला कांदा बाजार सुरू झाल्याने नेवासा शहर व परिसराच्या विकासाला हातभार लागणार आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण ठेऊन
प्रश्न सोडवणारे नेतृत्व माजी मंत्री शंकरराव गडाख आहेत.
मा खा यशवंतराव गडाख पाटील व स्व मारुतराव घुले पाटील यांनी संताना बरोबर घेऊन समाजाच्या हिताचे कामे करण्याची परंपरा माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी समर्थपणे चालू ठेवली आहे.
खुला कांदा बाजारास महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील म्हणाले
मोठ्या कष्टाने 24 वर्षांपूर्वी घोडेगाव येथे कांदा मार्केट सुरू केले आज घोडेगाव मार्केटचा
राज्यात क्रमांक लागतो
घोडेगाव कांदा मार्केट सुरू करतांना घोडेगाव ग्रामस्थांनी सहकार्य केल्याने गावाला फायदा झाला.
👉या कार्यक्रमाचे सविस्तर वृत्त खबरनामा यूट्यूब चैनल वर पहा लाल बटनला क्लिक करून सविस्तर बातमी पहा येथे👇👇
नेवासा शहरात
खुला कांदा बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांना
हक्काची बाजार पेठ उपलब्ध झाली आहे
कांदा बाजार वृद्धिंगत व्हावा यासाठी
नेवासकरांनी पुढाकार घ्यावा
आपण सर्व मिळून प्रयत्नशील राहू.
नेवासा शहरात खुला कांदा बाजार सुरू झाल्याने नेवासा शहरातील व परिसरातील
अर्थकारणाला बळकटी मिळणार आहे.
नेवासा येथे खुला कांदा बाजार सुरू व्हावा यासाठी तालुक्यातील व बाहेरील व्यापारी यांच्याशी संवाद साधून व अभ्यासपुर्वक बाजार सुरू केला आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांना कांदा व्यापारी म्हणून संधी दिल्याने शेतकऱ्यांना मालाला रास्त भाव मिळणार आहे
शेतकरी व व्यापारी यांचा समन्वय ठेऊन
कांदा बाजार अग्रेसर होण्यासाठी प्रयत्नशील राहू.
नेवासा बाजार समिती नेहमीच शेतकरी हितासाठी प्राधान्य दिले जाते असे म्हणाले
पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर विक्रमी संख्येने कांदा विक्रीस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे मा मंत्री शंकरराव गडाख यांनी स्वागत केले
याप्रसंगी माजी आ पांडुरंग अभंग, ऍड देसाई आबा देशमुख,आंबदास कोरडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर,
ह भ प देविदास महाराज म्हस्के,मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत कांद्याचा लिलाव संपन्न झाला
याप्रसंगी बाजार समितीचे मा सभापती डॉ शिवाजी शिंदे, दत्तात्रय काळे,तुकाराम शेंडे,कडूबाळ कर्डीले,काकासाहेब शिंदे, उपसभापती नानासाहेब नवथर,रामभाऊ जगताप,भाऊसाहेब मोटे,श्रीरंग हारदे,तुकाराम मिसाळ,दिलीपराव पवार,एकनाथ धानापुणे ,अजित मुरकुटे,गोरक्षनाथ तनपुरे,माऊली कार्ले,संजय सुखधान, जितेंद्र कु-हे,प्रभाकर कोलते,बाळासाहेब गोरे,नवनाथ पठाडे,कृष्णा शिंदे,बाळासाहेब शिंदे, महेश शिंदे, सतीश पटारे,अशोक हारदे,संजय आहेर,अभिजीत लुनीया,भाऊसाहेब कांगुणे, बाबासाहेब जगताप,वैभव नवले,बाबा घुले, सतीश पिंपळे,हिरालाल धनवडे, नागेश आघाव,बाळासाहेब परदेशी,पांडुरंग निपुंगे,बाबासाहेब भणगे,शिवाजी पाठक, डॉ संतोष फुलारी, बाबासाहेब रोटे,पोपट सरोदे,अरुण निपुंगे, बाळासाहेब तनपुरे,विठ्ठल नाबदे,सोपान पंडित,भगवान काळे,दिगंबर वरखडे,साहेबराव पवार,सुदर्शन वाकचौरे,भानाभाऊ चौधरी,कैलास जाधव,शशिकांत मतकर, काकासाहेब गायके,निलेश पाटील,नारायण लोखंडे,संभाजी पवार,दादासाहेब कोकणे,जालु गवळी,संभाजी धोत्रे,दिनेश व्यव्हारे,डॉ राहुल चव्हाण,गणेश चावरे,बाजार समितीचे सर्व संचालक आदींसह नेवासा तालुक्यातील विविध गावांचे सरपंच,चेअरमन, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

नेवासा बाजार समिती खुला कांदा बाजार शुभारंभ प्रसंगी पहिल्याच दिवशी 315 वाहनांची आवक झाली
प्रति क्विंटल 1130 रु पर्यत कांद्यास भाव मिळाला

नेवासा येथे खुला कांदा बाजार शुभारंभ लिलाव प्रसंगी महंत उद्धव महाराज मंडलिक,
ह भ प देविदास महाराज म्हस्के,माजी मंत्री शंकरराव गडाख,मा आ पांडुरंग अभंग ,संचालक मंडळ आदी
खबरनामा न्यूज नेवासा




