Breaking
नेवासानेवासा प्रेस क्लबपोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगविशेष निवड

नेवासा प्रेस क्लब अध्यक्षपदी गुरूप्रसाद देशपांडे यांची बिनविरोध निवड

ज्येष्ठ पत्रकार अशोकराव डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; पत्रकार भवन व वसाहतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

0 6 2 0 6 2

नेवासा प्रेस क्लब अध्यक्षपदी गुरूप्रसाद देशपांडे यांची बिनविरोध निवड

 

ज्येष्ठ पत्रकार अशोकराव डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; पत्रकार भवन व वसाहतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

बातमी (खबरनामा न्यूज | नेवासा प्रतिनिधी):

नेवासा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी गुरूप्रसाद देशपांडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड सोमवार (दि. १२) रोजी ज्येष्ठ पत्रकार अशोकराव डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीत पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविणे, महत्त्वाच्या विषयांवर पत्रकार परिषदा आयोजित करणे, त्यासाठी नियोजन करणे, तसेच शहरातील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पत्रकार भवन व पत्रकार वसाहतीच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली.

कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मावळते अध्यक्ष तथा दैनिक सकाळचे प्रतिनिधी मोहन गायकवाड यांनी प्रास्ताविक करत संघटनेच्या मागील कार्यकाळातील उपक्रमांचा आढावा घेतला.

नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे :

उपाध्यक्ष : कैलास शिंदे (पुढारी), अशोकराव डहाळे (सामना)

सचिव : सुहास पठाडे (लोकमत)

सहसचिव : मकरंद देशपांडे (सार्वमत)

खजिनदार : मोहन गायकवाड (सकाळ)

कार्याध्यक्ष : सुधीर चव्हाण (राष्ट्र सह)

संघटक : पवन गरुड, रमेश शिंदे (सार्वमत)

यावेळी मावळते अध्यक्ष मोहन गायकवाड यांच्या मागील वर्षातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रेस क्लबच्या वतीने अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावास सर्वानुमते संमती देण्यात आली.

या बैठकीस शंकर नाबदे, नानासाहेब पवार, शाम मापारी, अभिषेक गाडेकर यांच्यासह अनेक पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 0 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे