Breaking
कृषी कायदाकृषीवार्ताकेंद्रीय कृषिमंत्रीजिल्हाधिकारीतहसीलतहसीलदार नेवासानेवासा तालुकानेवासा मतदार संघ आमदार विठ्ठलराव लंघे साहेबपंचनामापाटबंधारे विभाग अभियंता अहिल्यानगरपोलीस निरीक्षक कार्यालय अहिल्यानगरपोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगमहसूल मंत्री व महसूल विभागमहाराष्ट्रहुकूमशाही

शेतात पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशारा

गेवराई ,गिडेगाव (ता. नेवासा) येथील पांडुरंग दशरथ आदमाने यांचे निवेदन; चारी पुन्हा जमीनदोस्त केल्याने पिकांचे नुकसान — १७ मार्च २०२६ रोजी उपोषणाचा इशारा

0 6 2 0 6 3

📰 मुख्य हेडलाईन :
शेतात पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशारा

गेवराई, गिडेगाव (ता. नेवासा) येथील पांडुरंग दशरथ आदमाने यांचे निवेदन; चारी पुन्हा जमीनदोस्त केल्याने पिकांचे नुकसान — १७ मार्च २०२६ रोजी उपोषणाचा इशारा

खबरनामा न्यूज | नेवासा

गवर्डे (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील शेतकरी पांडुरंग दशरथ आदमाने यांनी शेतात पाणी मिळत नसल्याने आमरण उपोषणाचा इशारा देत कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर यांना निवेदन दिले आहे.
११ मार्च २०२६ रोजी दिलेल्या या निवेदनात आदमाने यांनी म्हटले आहे की, त्यांच्या आई लिलाबाई दशरथ आदमाने यांच्या नावावर गट क्रमांक १६९/२ मध्ये १ हेक्टर ८८ आर क्षेत्र आहे. या जमिनीला यशवंत पाणी वापर संस्था, सलाबतपूर यांच्या मार्फत चारी क्रमांक ११ मधून पाटपाणी मिळत होते.
मात्र ही चारी सध्या पुन्हा जमीनदोस्त करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याबाबत यापूर्वी 29 एप्रिल २०२३ रोजी उपोषणासाठी अर्ज केला होता. त्यावेळी नेवासा पोलीस स्टेशन येथे झालेल्या बैठकीत शाखाधिकारी सलाबतपूर कालवा निरीक्षक श्री. जाधव (कालवा चौकीदार) आणि सचिव श्री. धाडगे (यशवंत पाणी वापर संस्था) यांनी शेतावरील चारी पुन्हा तत्काळ पूर्ववत करून दिली जाईल, असे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते.
मात्र दिलेल्या आश्वासनानंतरही चारी पुन्हा जमीनदोस्त करण्यात आल्याने सध्या शेताला पाणी मिळत नसल्याचे आदमाने यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढून चारीची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा १७ मार्च २०२६ रोजी कार्यकारी अभियंता कार्यालयात आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
या निवेदनाची प्रत कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग अहिल्यानगर, उपकार्यकारी अभियंता चिलेखेवाडी (ता. नेवासा), शाखाधिकारी सलाबतपूर, सचिव/अध्यक्ष यशवंत पाणी वापर संस्था सलाबतपूर, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर आणि पालकमंत्री अहिल्यानगर यांना पाठवण्यात आली आहे.

पोस्ट आणि रजिस्टर पाठवलेली आहे निवेदन

👇👇👇


संपादक : नरेंद्र पाटील काळे
खबरनामा न्यूज

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 0 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे