Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरदिव्यांग लोकांसाठी शिबिरशिर्डीशिर्डी देवस्थान

शिर्डीत मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबिराचे आयोजन

श्री साईबाबा संस्थान व महावीर विकलांग सहाय्यता समितीचा संयुक्त उपक्रम

0 6 1 1 2 5

शिर्डीत मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबिराचे आयोजन

श्री साईबाबा संस्थान व महावीर विकलांग सहाय्यता समितीचा संयुक्त उपक्रम

शिर्डी | प्रतिनिधी

अपघात किंवा विविध आजारांमुळे पाय गमावलेल्या दिव्यांग व्यक्तींना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी आणि श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती, मुंबई (जयपूर फूट) यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर

📅 गुरुवार दि. १९ जानेवारी ते रविवार दि. २२ जानेवारी २०२६

📍 स्थळ : श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम), शिर्डी

येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या पायाचे मोजमाप घेण्यात येणार असून आवश्यकतेनुसार कृत्रिम पाय (जयपूर फूट) मोफत बसवून देण्यात येणार आहेत. शिबिराची दैनंदिन वेळ रुग्णालय प्रशासनाकडून निश्चित केली जाणार असून लाभार्थींनी नोंदणी व अधिक माहितीसाठी थेट रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिबिराचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या एका सोबतच्या व्यक्तीसाठी राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नोंदणी करताना लाभार्थींनी

आधार कार्ड किंवा अन्य शासकीय ओळखपत्र

दोन पासपोर्ट साईज फोटो

सोबत आणणे आवश्यक आहे.

📞 संपर्क : श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम), शिर्डी – (०२४२३) २५५५५५

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे