Breaking
जिल्हा परिषद अहिल्यानगरनिवडणूक वार्तानेवासानेवासा तालुकानेवासा तालुका काँग्रेस पक्षपोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंग

नेवासा काँग्रेसची जि.प. व पं.स. निवडणूक नियोजनासाठी लवकरच आढावा बैठक

इच्छुक उमेदवारांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन

0 6 0 6 2 8

नेवासा काँग्रेसची जि.प. व पं.स. निवडणूक नियोजनासाठी लवकरच आढावा बैठक

इच्छुक उमेदवारांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन

(नेवासा प्रतिनिधी) – नेवासा काँग्रेस कमिटीकडून होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने लवकरच आढावा बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून नेवासा तालुक्यातही निवडणुकीचे वातावरण तापले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत नेवासा तालुक्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत चांगले प्रदर्शन केले. या यशामुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, जनतेचा काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक झाल्याचे दिसून येत आहे.

येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने कायमच चांगले प्रदर्शन केले असून, नेवासा तालुक्यात याआधी काँग्रेसचे दोन जिल्हा परिषद सदस्य व तीन पंचायत समिती सदस्य कार्यरत होते.

तालुक्यात काँग्रेस पक्षाची पारंपरिक मोठी वोट बँक असल्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस चांगले प्रदर्शन करेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व तयारीसाठी येत्या दोन दिवसांत नेवासा शहरात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत नेवासा तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असून, तालुक्यातील सर्व गट व गणातून इच्छुक उमेदवारांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे अण्णासाहेब पटारे यांनी केले आहे. या बैठकीत काँग्रेसकडून कोणते निर्णय घेतले जाणार, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

“नगरपंचायत निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढलो. शहरातील जनतेने काँग्रेसला प्रतिसाद दिला. घराघरात काँग्रेस पोहोचविण्यास आम्ही यशस्वी झालो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्येही काँग्रेस पक्ष नेवासा तालुक्यात स्वबळावर लढणार आहे.”

— संभाजी माळवदे

 

काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून देशपातळीवर समाजासाठी काम करणारा सेक्युलर पक्ष अशी काँग्रेसची ओळख आहे. खऱ्या अर्थाने आमचा लढा भाजप पक्षाशी आहे. इतर पक्षांशी आमची लढाई नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये हा लढा आम्ही जिंकून दाखवू.”

— अंजुम पटेल

1/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे