शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ. संगीता गणेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल
शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ. संगीता गणेश जाधव यांनी आज तिशोर गट, जिल्हा परिषद मतदारसंघ (ता. कन्नड, जि. संभाजीनगर) येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.


शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ. संगीता गणेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल*
*कन्नड | प्रतिनिधी –* *खबरनामा न्यूज*
*दिनांक :* 20 जानेवारी 2026
शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक मा. रघुनाथदादा पाटील* तसेच शेतकरी महिला आघाडीच्या नेत्या डॉ. प्रगती खरे चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, स्वर्गीय शरद जोशी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न थेट लोकप्रतिनिधी म्हणून मांडण्याच्या उद्देशाने शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ. संगीता गणेश जाधव यांनी आज तिशोर गट, जिल्हा परिषद* मतदारसंघ (ता. कन्नड, जि. संभाजीनगर) येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.प्रचार यंत्रणेचा कार्यभार जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर शेतकरी संघटना अनिल राव औताडे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे महिला आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रगती खरे चव्हाण हे असणार आहेत
शरद जोशी यांच्या शेतकरी हिताच्या विचारधारेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याची ही शेतकरी वर्गासाठी सुवर्णसंधी असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. पाणी प्रश्न, शेतीमालाला रास्त भाव, महिला शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार आणि ग्रामविकास हे प्रमुख मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवली जाणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांचा आवाज थेट निर्णयप्रक्रियेत पोहोचवण्यासाठी ही लढाई असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

शेतकरी संघटनेच्या विचारधारेवर आधारित, संघर्षशील व प्रश्नकेंद्री नेतृत्व म्हणून सौ. संगीता गणेश जाधव यांची उमेदवारी तिशोर गटात चर्चेचा विषय ठरत असून, निवडणूक वातावरण तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
✍️ *कन्नड प्रतिनिधी | खबरनामा न्यूज*




