Breaking
अर्थसंकल्प केंद्र सरकारआत्महत्याग्रस्त शेतकरीआरबीआयचे नवीन पद धोरणई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी उत्पन्न बाजार समितीकृषी कायदाकृषी मूल्य आयोगकृषी सन्मान पुरस्कारकृषीवार्ताजिल्हाधिकारीदौंडनिसर्गाचा प्रकोप व जंगलतोड आणि पशुपक्षीपुनर्वसन विभाग मंत्रालयमहा पारेषण कंपनी विद्युत मंडळमहाराष्ट्रमहाराष्ट्र विद्युत मंडळमहाराष्ट्र शासन कर्ज माफीमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईशिबिरशेतकरी आंदोलनशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यशेती निर्यात आयात धोरण केंद्र सरकारसंवाद विधानसभास्वातंत्र्य दिनहमीभावहुकूमशाही

शेतकरी संघटनेची सांगली जिल्हा बैठक मा.रघुनाथदादा पाटील यांचे अध्यक्षतेखालील संपन्न.

9 ऑगस्ट 2025 रोजी क्रांतीदिनी योगेश्वरी हॉल डिकसळ ता.इंदापूर जि.पुणे येथे ऊस व दुध परिषदेचे आयोजन केले आहे. 

0 6 0 6 2 2

शेतकरी संघटनेची सांगली जिल्हा बैठक मा.रघुनाथदादा पाटील यांचे अध्यक्षतेखालील संपन्न.

 

दि.02/08/2025 : शासकीय विश्रामगृह माधवनगर रोड सांगली. 

 

9 ऑगस्ट 2025 रोजी क्रांतीदिनी योगेश्वरी हॉल डिकसळ ता.इंदापूर जि.पुणे येथे ऊस व दुध परिषदेचे आयोजन केले आहे. 

 

या परिषदेच्या मागण्या १) शेतकऱ्यांच्या सर्व उत्पादीत शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवलीच पाहीजे. २) संपूर्ण कर्ज, वीज बीलमुक्ती झालीच पाहिजे ३) ऊसाला पहिला हप्ता ५००० रू. प्रती टन मिळालाच पाहिजे. ४) दोन साखर व इथेनॉल कारखान्यातील २५ किमी हवाई अंतराची अट रद्द झालीच पाहिजे. ५) वन्य प्राणी संरक्षण कायदा व गोवंश हत्या बंदी कायदा रद्द झाला पाहिजे. ६) गाईच्या व म्हैशीच्या दुधाला प्रती लिटर १९८० च्या भाव पातळी प्रमाणे १ लि. डिझेल व १ लि. पेट्रोल इतका दर मिळाला पाहिजे.

वन्य प्राण्यांच्या त्रास कमी होण्यासाठी ग्रामपंचायतींचे ठराव करून महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव संरक्षक यांच्याकडून त्या संबंधित प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत कडून मागणी करण्यात येत आहे. शेतकरी संघटने कडून या ठरावाची प्रत सर्व वन्य प्राण्यांचा त्रास असणाऱ्या गावात दिले जात आह

तसेच या बैठकीत कृषी पंपाचे 7 एचपी च्या पुढील विज बिल माफ करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात शेतकऱ्याने सहभागी व्हावे याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या वन्य प्राण्यांचा त्रास, भटक्या कुत्र्यांचा त्रास सर्वसामान्य शेतकऱ्यांसह नागरिकांना होत आहे याकडे सरकारने डोळसपणे बघून प्राण्यांच्या प्रजननाचा दर बघून वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा. याबद्दल चर्चा करण्यात आल्या

या बैठकीस नंदकुमार पाटील जिल्हाध्यक्ष, शंकरराव मोहिते जिल्हा उपाध्यक्ष, धनपाल माळी जिल्हा सरचिटणीस, डॉक्टर प्रगती चव्हाण महिला आघाडी अध्यक्षा, आप्पासाहेब पाटील, लक्ष्मण पाटील, केतन जाधव, अरुण पाटील, आबासाहेब वावरे, बलराम बाबर, सर्जेराव देवकर, इसाक सौदागर, बेगमबी शेख, कविता पाटील श्याम येडेकर, शिवाजी दुर्गाडे, हनुमंत पाटील, चंद्रकांत रास्ते आदि प्रमुख उपस्थित होते.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे