शेतकऱ्यांना दिलासा : जमिनीच्या मोजणीसाठी फी आता फक्त ₹200
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा – राज्य शासन लवकरच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करणार

शेतकऱ्यांना दिलासा : जमिनीच्या मोजणीसाठी फी आता फक्त ₹200
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा – राज्य शासन लवकरच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करणार
📝 बातमी :
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आता जमीन विभागणी व नकाशा तयार करण्यासाठी लागणारी मोजणी फी केवळ ₹200 इतकी करण्यात आली आहे.
याबाबत माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून, आधी हजारो रुपयांचा खर्च असलेली मोजणी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी आता परवडणारी झाली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जमीन विभागणी संबंधीचे वाद व खर्चाचा बोजा मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत.
दरम्यान, या संदर्भातील अधिकृत गॅझेट अधिसूचना महसूल विभागामार्फत लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना अद्याप अधिकृत अधिसूचनेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
👉 हा निर्णय लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना न्यायालयीन खटले, विभागणीतील ताणतणाव आणि आर्थिक अडचणींमधून दिलासा मिळणार असल्याचे अपेक्षित आहे.




