Breaking
अहमदनगरआमदार शंकरराव गडाखई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकृषीवार्ताजिल्हा सहकारी बँक अहमदनगरजिल्हाधिकारीतहसीलदार नेवासानिवडणूकनिवडणूक आयुक्तनिवडणूक वार्तानेवासापालकमंत्री राधाकृष्ण विखेब्रेकिंगमहाराष्ट्रमहाराष्ट्र शासन कर्ज माफीमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईराजकियविशेष निवडसहकार जिल्हा निबंधकसहकार महर्षी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानासहकारी साखर कारखानासहकारी साखर कारखाने एफ आर पीसाखर आयुक्त अहमदनगरसोनईहमीभाव

शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे नेवासा सोसायटी मतदारसंघातून शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज

जिल्हा बँक निवडणुकीत गडाखांची बिनविरोध निवड नेवासा तालुक्यातील सहकारावरील वर्चस्वाची पुन्हा चर्चा

0 7 4 4 5 8

📰 खबरनामा NEWS

शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे

नेवासा सोसायटी मतदारसंघातून शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज

जिल्हा बँक निवडणुकीत गडाखांची बिनविरोध निवड

नेवासा तालुक्यातील सहकारावरील वर्चस्वाची पुन्हा चर्चा

अहिल्यानगर प्रतिनिधी.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी, सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी नेवासा तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुमारे १३० सेवा सोसायटी मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष

नेवासा तालुक्यातील सुमारे १३० सेवा सोसायटी मतदार असलेल्या या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू असताना नेवासा तालुक्यात मात्र मा मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज राहिल्याने सहकार क्षेत्रातील ही निवडणूक विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

सहकार क्षेत्रातील गडाखांच्या पूर्वीच्या कामाचीही चर्चा

शंकरराव गडाख हे सहकार क्षेत्रातील अभ्यासु नेतृत्व असून, यापूर्वी जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. सन २००७ मध्ये त्यांच्या कार्यकाळात महिला बचत गटांना 4 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला गेला होता.

नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रात राजकीय-सामाजिक ताकद अधोरेखित

नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रात गडाख यांची असलेली राजकीय व सामाजिक ताकद या उमेदवारीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा तालुक्यासह जिल्हाभरात सुरू आहे,

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 4 4 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे